Child Marriage  File Photo
नाशिक

Child Marriage Prevention Maharashtra | ६९ बालविवाह रोखण्यात 'महिला, बालविकास' ला यश

सव्वा वर्षात प्रशासनाकडे ११३ तक्रारी प्राप्तः चार जणांवर गुन्हे दाखल; जिल्हा प्रशासनाच्या उपाययोजना

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : विकास गामणे

एकीकडे मुली पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अंतराळापर्यंत शेप चेत असताना, दुसरीकडे समाजातील काही घटकांमध्ये अद्यापही मुलीची जबाबदारी लवकरात लवकर झटकण्याची मानसिकता कायम असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. जिल्ह्यात गेल्या १५ महिन्यांत बालविवाहाच्या तब्बल ११३ ताकारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी ६९ बालविवाह रोखण्यात महिला व बालविकास विभागाला यश आले आहे.

अक्षय तृतीयेच्या मुहर्तावर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बालविवाह लावले जाण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना कड़क केल्या होत्या. बालविवाह प्रतिबंधक महाराष्ट्र बालविवाह प्रतिबंध अधिनियम २०२२ नुसार, बालविवाह हा अजामीनपात्र गुन्हा आहे. यामध्ये दोषी आढळल्यास २ वर्षांपर्यंत सक्त मजुरी आणि १ लाख व रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. जानेवारी २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत बालविवाहाविरोधात कडक मोहीम राबविण्यात आली.

या १५ महिन्यांत एकूण ११३ तक्रारी प्रशासन दरबारी प्राप्त झाल्या होत्या. प्राप्त तक्रारींची दखल घेऊन प्रशासनाने समुपदेशनाच्या माध्यमातून ६९ रोखलेले किव्या रोखले. यात ४ जणांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. वयाचा पुरावा योग्य असल्याने १४ तक्रारी या अपात्र ठरल्या, तर २७ प्रकरणे ही इतर जिल्हे बालविवाह प्रतिबंधक अधिकायांकडे वर्ग करण्यात आली आहे. सन २०२५ मध्ये ८० तक्रारींपैकी ४७ विवाह रोखले गेले आहे.

नागरिकांना आवाहन मुलीना मोफत शिक्षण आणि रोजगाराच्या अनेक संधी शासन उपलब्ध करून देत आहे, तरीही आपल्या आसपास १८ वर्षांखालील मुलगी किंवा २१ वर्षाखालील मुलाचा विवाह होत असल्याचे आढळल्यास तत्काळ १०९८ या चाइल्ड हेल्पलाइनचर संपर्क साधावा.

बालविवाह रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा

जर आपल्या परिसरात बालविवाह होत असेल, तर तुम्ही खालील यंत्रणांकडे तक्रार करू शकता: चाइल्ड हेल्पलाइन : १०९८ (१०९८) या टोल फ्री क्रमांकावर फोन करावा. पोलिस ठाणे जवळच्या पोलिस ठाण्यामध्ये माहिती चावी, ग्राम बाल संरक्षण समिती गाव पातळीवर सरपंच, ग्रामसेवक किंवा अंगणवाडीसेविका यांच्याशी संपर्क साधावा, वालविवाह प्रतिबंधक अधिकारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा.

बिगर आदिवासी तालुक्यात प्रमाण अधिक

बालविवाह हे प्रामुख्याने आदिवासी तालुक्यात होत असल्याचा समज आहे. मात्र, बिगर आदिवासी तालुक्यातून सर्वाधिक तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. यातही नाशिक शहरालगत असलेल्या नाशिक तालुक्यात सर्वाधिक २१ तक्रारी बालविवाहाच्या नोंदविल्या गेल्या आहेत. याशिवाय सिलर, मालेगाव, निफाड, येवला, नांदगाव या तालुक्यांमध्येही बालविवाह होत असल्याचे आवाडेवारीवरून दिसून येत आहे.

पंडित, वाजंत्री, लॉन्समालक सावधान !

केवळ आई-वडीलच नाही, तर बालविवाहात सहभागी होणारे धार्मिक गुरू, पंडित, मंडपचालक, फोटोग्राफर, केटरिंग व्यावसायिक आणि लॉन्समालक यांच्यावरही आता कायदेशीर कारवाईची टांगती तलवार आहे. या सर्वांनी विवाहापूर्वी मुलगा व मुलगी यांच्या वगाची खात्री करणे अनिवार्य आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT