Nashik Mobile Shop
नाशिक : एम. जी. रोड येथील मोबाईल दुकानांची तपासणी करताना पोलीस. (छाया : हेमंत घोरपडे)
नाशिक

Nashik News | परप्रांतीय मोबाइल विक्रेत्यांची अरेरावी; ग्राहकांची दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : महात्मा गांधी रोडवरील परप्रांतीय मोबाइल विक्रेत्यांची अरेरावी कायम असून बनावट साहित्य विक्री करून ग्राहकांची दिशाभूल केल्याप्रकरणी पाच विक्रेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कारवाई सुरू असताना छायाचित्रकारांकडे पाहून 'पावडर बिवडर लावू' असे बोलून अप्रत्यक्षपणे कारवाईचे गांभीर्य नसल्याचे भासवत मुजोरपणा दाखवला.

भद्रकाली पोलिसांनी सोमवारी (दि. १५) सायंकाळी 4 ते 7.30 च्या सुमारास महात्मा गांधी रोडवरील श्री मॉजिसा मोबाइल ॲक्सेसरीज, ए. जी. एम. कॉर्पोरेशन, श्री रिद्धी सिद्धी इम्पेक्स, श्री बालाजी, आशापुरा मोबाइल या दुकानांमध्ये कारवाई केली. या दुकानांमध्ये ॲपल कंपनीचे बनावट साहित्य विक्री होत असल्याची माहिती कंपनीला मिळाली होती. त्यानुसार कंपनीने पोलिसांना सांगितल्यानंतर कारवाई केली असता, पाचही दुकानांतून तीन लाख ५२ हजार ७०० रुपयांची मोबाइलचे बनावट ॲक्सेसरीज आढळल्याने ती जप्त करण्यात आली. याप्रकणी कल्याण येथून आलेले कुंदन बेलोशे यांनी भद्रकाली पोलिस ठाण्यात प्रतिलिपी अधिकारी कायद्यानुसार फिर्याद दाखल केली आहे.

या कारवाईमुळे नामांकित कंपनीच्या नावे बनावट मोबाइल साहित्य विक्री करणाऱ्या Misleading consumersदुकानचालकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यात ब्रँडेडच्या नावाखाली बनावट साहित्य विक्री करून ग्राहकांची दिशाभूल करणे, त्यांचे आर्थिक नुकसान करणे तसेच कंपनीचेही नुकसान करण्याचे प्रकार काही विक्रेत्यांकडून होत असल्याचा आरोप आहे. त्याचप्रमाणे या मोबाइल व साहित्य विक्रेत्यांची अरेरावी वाढत असून, पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्यानेही अरेरावी वाढल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

याआधीही आरोप

परिसरातील मोबाइल विक्रेत्यांविरोधात याआधीही मारहाण, दमबाजी करणे आदी तक्रारी आहेत. ग्राहकांना वस्तु खरेदीसाठी बळजबरी करणे तसेच खरेदी न केल्यास एका ग्राहकास पाठलाग करीत बेदम मारहाण केल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती. तसेच स्थानिक व परप्रांतीय व्यावसायिकांमध्येही वाद झाले होते. बनावट साहित्य विक्री करून ग्राहकांची फसवणूक करणे. तसेच बनावट साहित्य विक्रीप्रकरणी याआधीही पोलिसांनी विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.

SCROLL FOR NEXT