Nashik Crime : पत्नीला डान्सबारमध्ये नाचण्यास पाडले भाग, पतीसह, मित्रावर गुन्हा दाखल File Photo
नाशिक

Nashik Crime : पत्नीला डान्सबारमध्ये नाचण्यास पाडले भाग, पतीसह, मित्रावर गुन्हा दाखल

गुंगीचे औषध देऊन पत्नीचे अपहरण करून तिचे अश्लील व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी

पुढारी वृत्तसेवा

Wife forced to dance in dance bar, case registered against husband, friend

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गुंगीचे औषध देऊन पत्नीचे अपहरण करून तिचे अश्लील व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत पतीसह त्याच्या मित्राने डान्सबारमध्ये बळजबरीने नाचकामास भाग पाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महिला ही पंचवटी परिसरात राहते. संशयित आरोपी पवन व अक्षय यांनी संगनमत करून फिर्यादी महिलेस राहत्या घरी गुंगीकारक औषध देऊन तिचे अपहरण केले. त्यानंतर तिला बंगळुरू व सोलापूर या ठिकाणी नेऊन तिचे अश्लील व्हिडिओ काढले. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला शिवीगाळ व मारहाण केली. तसेच तिच्या इच्छेविरुद्ध तिला डान्सबारमध्ये बळजबरीने नाचकाम करण्यास भाग पाडले.

हा प्रकार ऑगस्ट २०२२ पासून २१ जुलै २०२५ या कालावधीत घडला. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीनुसार संशयित पती व त्याच्या मित्राविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मेमाणे हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT