ओपन- हार्ट सर्जरी Pudhari News Network
नाशिक

ओपन- हार्ट सर्जरी म्हणजे काय?

ओपन- हार्ट सर्जरी गंभीर हृदयविकार असलेल्या रुग्णांचे आयुष्य वाढवते

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : दिलीप सूर्यवंशी

ओपन- हार्ट सर्जरी गंभीर हृदयविकार असलेल्या रुग्णांचे आयुष्य वाढवू शकते. हृद्याच्या धमन्यांमधील कॉलेस्ट्रॉलमुळे जेव्हा नसांच्या भिंती कठोर, कडक होतात, झडपांचे रोग निर्माण होतात किंवा हृदयाच्या सामान्य गतीला विरोध निर्माण होतो, तेव्हा रक्तप्रवाह पुनर्संचयित करणे, हृदयाच्या झडपांची दुरुस्ती करणे किंवा बदलणे, हृदयातील दोष सुधारणे अत्यावश्यक असते, अशावेळी हृदयाच्या झडपा, खराब झालेले भाग किंवा हृदयात वस्तू बसवण्यासाठी ओपन- हार्ट सर्जरी केली जाते. ओपन- हार्ट सर्जरीत हृदय बदलण्याची शस्त्रक्रियादेखील केली जाते. कधीकधी अयशस्वी अँजिओप्लास्टी झालेल्या रुग्णांवर ओपन- हार्ट सर्जरी केली जाते.

ओपन हर्ट सर्जरी कशी केली जाते?

प्रथम ॲनेस्थेशिया दिला जातो, जेणेकरून व्यक्तीला हृदयाची शस्त्रक्रिया करताना त्रास होणार नाही. यानंतर छातीमध्ये 8 ते 10 इंचाचा काप दिला जातो. हृदय- फुफ्फुसाच्या लिप बायपास मशीनला जोडले जाते. त्यामुळे त्याला श्वास घेण्यात त्रास होत नाही. हृदयावर शस्त्रक्रिया करण्यासाठी निरोगी शिरेचा वापर केला जातो, त्यामुळे ब्लॉक धमनीच्या आसपास नवीन जागा केली जाऊ शकते. ब्लॉक धमनी निश्चित केल्यावर, टाके टाकून छाती बंद केली जाते. शस्त्रक्रियेनंतर रुग्ण जागे होताच, श्वासोच्छवासाच्या नळ्या जोडल्या जातात.

ओपन- हार्ट शस्त्रक्रियेनंतर घ्यावयाची काळजी

पूर्ण बरे होण्यासाठी साधारणपणे 6 ते 12 आठवडे लागतात यादरम्यान योग्य काळजी घेणे आवश्यक असते. चिराची जागा नियमितपणे स्वच्छ केली आणि वाळवली पाहिजे. अंघोळ करण्याऐवजी स्पंज बाथ घेणे गरजेचे असते. हृदय शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना वेदना जाणवणे सामान्य आहे. मात्र त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. वेदना वाढल्या, तर डॉक्टरांशी संपर्क साधावा. योग्य बेड रेस्ट अन वेळेवर औषधे घेणे अनावश्यक ताण कमी करण्यासाठी उशीसह योग्य बेडचा वापर केला पाहिजे. हलके व्यायाम करावे, जड वस्तू उचलू नयेत.

ओपन- हार्ट सर्जरीचे अनेक धोके

छातीत संसर्ग होण्याची शक्यता, हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक, छातीत संसर्ग होण्याची शक्यता. मूत्रपिंड निकामी होणे. स्मृती कमी होणे. थ्रोम्बोइम्बोलिझम किंवा रक्ताच्या गुठळ्या. श्वास घेण्यात अडचण. रक्त कमी होणे

ओपन हर्ट सर्जरीचे मुख्यत: तीन प्रकार

  1. कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंग : यामध्ये शरीरातील इतर ठिकाणाहून एक निरोगी धमनी किंवा शीर काढून ब्लॉक केलेल्या कोरोनरी आर्टरीमधून रक्तपुरवठा करण्यासाठी ती जोडली जाते. ग्राफ्टेड आर्टरी किंवा शीर कोरोनरी आर्टरीच्या ब्लॉक केलेल्या भागाला बायपास करते, ज्यामुळे हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करण्यासाठी नवीन मार्ग तयार होतो.

  2. हृदयाच्या झडपाची दुरुस्ती किंवा बदल : हृदयाच्या झडपाच्या दुरुस्ती किंवा बदलीमध्ये, मोठ्या रक्तवाहिनीतून कॅथेटर घालणे, ते हृदयाकडे नेणे आणि अरुंद झडप रुंद करण्यासाठी कॅथेटरच्या टोकावर एक लहान फुगा फुगवणे आणि डिफ्लेट करणे.

  3. पेसमेकर बसविणे : हृदयाचे ठोके खूप जलद, खूप मंद किंवा अनियमित लय असलेल्या अरिथमियासाठी औषध हा पहिला उपचार पर्याय असतो. काही प्रकरणांमध्ये, औषधाचा रुग्णावर कोणताही परिणाम होत नाही. त्यानंतर सर्जन छातीच्या किंवा पोटाच्या त्वचेखाली पेसमेकर बसवू शकतो, ज्यामध्ये तारा असतात, ज्या त्याला हृदयाच्या चेंबरशी जोडतात.

ओपन- हार्ट आणि हार्ट बायपास सर्जरीमधील फरक

छाती उघडण्यापासून सुरू होणार्‍या कोणत्याही शस्त्रक्रियेला ओपन- हार्ट सर्जरी म्हणतात. बायपास सर्जरी ही ओपन- हार्ट सर्जरीचा एक प्रकार आहे. बायपास सर्जरीमध्ये, छाती किंवा पायातील रक्तवाहिनी ब्लॉकेज असलेल्या कोरोनरी आर्टरीवर बसविली जाते. याद्वारे धमन्यांचा ब्लॉक केलेला भाग बायपास केला जातो आणि या नवीन वाहिनीमधून रक्त सहज वाहू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT