नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क
गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शनिवार (दि.3) रोजीपासून जोरदार पाऊस सुर असून, पावसाची संतत धार रविवार ( दि.4) रोजी आजही कायम आहे. गंगापूर धरणात 80.71 टक्के पाणीसाठा जमा झाल्याने धरणातून टप्या टप्याने विसर्ग करण्यात येणार आहे. (80.71 percent water storage in Gangapur dam)
आज रविवार ( दि.4) रोजी दुपारी 12:00 वाजता गंगापूर धरणातून एकूण विसर्ग 500 क्यूसेक पाणी सोडण्यात येणार आहे. त्यानंतर पुन्हा दुपारी 3:00 वाजता एकूण विसर्ग 1000 क्यूसेस पाणी सोडण्यात येणार असून पावसाचा जोर कायम असल्यास टप्या टप्याने धरणातून एकूण विसर्ग वाढवण्यात येणार असल्याचे गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रातून कळविण्यात आले आहे.
रविवार ( दि.4) रोजी सकाळी 9 वाजता (क्युसेकमध्ये विसर्ग)
दारणा - 22966
भावली - 1821
कडवा - 8298
भाम - 5920
पालखेड - 5570
नंदुरमध्यमेश्वर - 36731