नाशिक

Nashik News : मतदान केंद्रावर नियमांचे उल्लंघन, कुठे कांदाप्रश्न तर कुठे मतदान चिन्हांचा वापर

करण शिंदे

पंचवटी, पुढारी वृत्तसेवा : सोशल मीडियाचा प्रभाव दिवसेंदिवस तरुण आणि तरुणींवर वाढत चालला असून कुठलीही बाब सोशल मीडियावर विविध क्लुप्त्या करून त्या व्हायरल करून फेमस होण्याकडे सर्वांचाच कल असतो. निवडणुकीपूर्वी पिंपळगाव येथे झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेमध्ये एका तरूण शेतकऱ्यांने कांद्याचा प्रश्नावर बोला, असे भर सभेत बोलत लक्ष वेधून घेतले होते. या घटनेची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी या तरूणाची भेट घेतली.

पत्रकारांच्या प्रश्नावर जर तो आमचा कार्यकर्ता असेल तर तो आमचा कार्यकर्ता आहे असे जाहीर केले. यामुळे या निवडणुकीत कांद्याची माळ आणि कांदा हे एक फेमस होण्याचे साधन झाले असून सोमवारी (दि.20) सी.डी.ओ. मेरी शाळा येथील मतदान केंद्रावर, एका नवमतदार युवकाने ईव्हीएम मशीन समोर कांदा ठेवून छायाचित्र काढल्याचे निदर्शनास आले. यानंतर मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांनी तात्काळ पोलिसांकडे पाचारण करत आणि घडलेला प्रकार सांगितला, या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराजांच्या तीन कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

एकलव्य निवासी आश्रमशाळा या मतदान केंद्रामध्ये दुपारच्या सुमारास अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांचे समर्थक शिवम संजय दाभाडे, विजय सुभाष दाभाडे व अजय सुभाष दाभाडे हे शांतीगिरी महाराज यांची बादली ही निशाणी, असलेली त्यांचे नाव असलेल्या चिठ्ठ्या मतदान केंद्रापासून १०० मीटर परिसराच्या आतमध्ये वाटप करत असताना आढळून आले. याबाबत त्यांना समज देण्यात आली होती. परंतु त्यांनी पोलिसांच्या या सूचनेकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर पुन्हा ते कार्यकर्ते मतदान केंद्र परिसरात फिरताना आढळले. या घटनेनंतर कार्यकर्त्यांवर पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT