Viral video
चॉपरचा व्हायरल झालेला व्हिडिओ. (छाया : राजेंद्र शेळके)
नाशिक

Nashik Crime News | पोलिसांच्या नाकावर टिच्चून 'चॉपरचे व्हिडिओ' व्हायरल

पुढारी वृत्तसेवा

सिडको : किरकोळ टपरीवाला ते मोठ्या दुकानदारापर्यंत रिक्षाचालक, छोटे हातगाडीवाले व सामान्य रहिवासी या गुंडगिरीला पुरते वैतागले आहेत. या गुंडगिरीविरोधात सरपंच अजिंक्य चुंभळे यांनी दंड थोपटल्याने परिसरातील सामान्य व्यावसायिकांनी त्यांचे कौतुक केले असले तरी संशयित गुंड चॉपरचे व्हिडिओ व्हायरल करीत असल्याने त्यांना पोलिसांचा धाकच उरला नसल्याचे उघड झाले आहे. अशा गुन्हेगारांना वेळीच अटकाव न झाल्यास गुन्ह्याची मोठी घटना घडू शकते, अशी भीती सामान्य व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

लेखानगर येथे नुकताच गौळाणे गावच्या सरपंचावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणातील पसार झालेल्या संशयितांनी अंबड पोलिसांच्या नाकावर टिच्चून, फोरव्हीलरमध्ये चॉपर दाखवत व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ता सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. यावरून, गुंडप्रवृत्ती आता पोलिसांनाही जुमानत नसल्याचे दिसून येत असून, पोलिस त्यांचा अद्याप शोधच घेत आहेत.

लेखानगर भागात एका गरीब व्यावसायिकास मारहाण करण्यात आली होती. पोलिसांत तक्रार करण्यास प्रोत्साहन दिल्याबद्दल अजिंक्य चुंभळे यांच्यावर चार ते पाच जणांनी गत सत्पाहात चॉपर व कोयते आणत जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी अंबड पोलिसात संशयित अजय आठवले, सोपियान शेख, शहारुख शेख, राजच आठवले, रोहित आठवले, रोहित मोरे (सर्व रा. लेखानगर वसाहत) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यातील मुख्य संशयित फरार आहे. अन्य सर्व जणांना अटक करण्यात आली असली तरी व्यावसायिक भीतीच्या सावटाखाली आहे. घटना घडल्यानंतर संशयित कारने फरार झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यात संशयित हातात चॉपर दाखवत गाण्यांमध्ये मग्न झाल्याचे दिसत आहे.

तिघांना अटक, दोघे फरार

अंबड पोलिसांनी संशयित अजय आठवले (२५), रोहित आठवले (२२), शहारुख शेख (२८) यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे, तर या गुन्ह्यात विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेऊन त्याची रवानगी बालसुधारगृहात केली आहे. या गुन्ह्यातील दोन संशयित फरारी आरोपीच्या शोधार्थ पोलिस पथक रवाना झाले आहेत.

कोयता जप्त

विधिसंघर्षित बालकाच्या घरातील झडतीत पोलिसांनी कोयता जप्त केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक किरण शेवाळे करीत आहेत.

SCROLL FOR NEXT