व्ही. एन. नाईक शिक्षण संस्था File Photo
नाशिक

K.V.N.Naik Sanstha Election | नाईक शिक्षण संस्थेवर प्रगती पॅनलचा झेंडा, सत्ताधाऱ्यांचा धुव्वा

गणेश सोनवणे

पुढारी ऑनलाइन डेस्क - क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या चार पॅनल मध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत विद्यमान सरचिटणीस हेमंत धात्रक व सहचिटणीस अॅड. तानाजी जायभावे यांच्या नेतृत्वाखालील प्रगती पॅनलने 29 जांगापैकी तब्बल 23 जागा जिंकत विजयाचा झेंडा रोवला.

अध्यक्षपदासाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत परिवर्तन पॅनलचे उमेदवार कोंडाजी आव्हाड हे विजयी झाले. त्यांनी विद्यमान अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांच्यासह प्रगती पॅनल चे उमेदवार तानाजी जायभावे यांचा पराभव केला. तर उपाध्यक्षपदी परिवर्तन पॅनलचे उदय घुगे निवडून आले. त्यांनी विद्यमान उपाध्यक्ष पी. आर. गिते यांचा पराभव केला.

तर महत्वाच्या सरचिटणीसपदावर हेमंत धात्रक हे विजयी झाले. त्यांनी माजी आमदार बाळासाहेब सानप यांचा पराभव केला. तर सहचिटणीस पदावर दिगंबर गीते हे विजयी झाले.

या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांच्या क्रांतीवीर विकास पॅनलचा व नवउर्जा पॅनलचा धुव्वा उडाला आहे.

एकुण 29 पैकी 23 जागा प्रगती पॅनल तर 6 जागा परिवर्तन पॅनलच्या निवडून आल्या आहेत.

व्ही. एन. नाईक . शिक्षण संस्थेच्या 29 जागांसाठी रविवारी (दि. 28) पंचवटीतील भावबंधन मंगल कार्यालयात मतमोजणी झाली. रात्री उशीरापर्यंत मतमोजणी सुरु होती.

अध्यक्ष पद- मिळालेली मते

कोंडाजी आव्हाड - २२३२(विजयी)

तानाजी जायभावे -२१०४

पंढरीनाथ थोरे- १९४९

सरचिटणीस पद - मिळालेली मते

प्रगती पॅनल - हेमंत धात्रक (२५३२) (विजयी)

परिवर्तन पॅनल - बाळासाहेब सानप (२२८४)

उपाध्यक्ष पद- मिळालेली मते

परिवर्तन पॅनल- उदय घुगे (२४४६) (विजयी)

प्रगती पॅनल- पी. आर. गीते (२०६३)

विजयी उमेदवार असे

विश्वस्त : (६ जागा) : प्रगती : दामोदर मानकर (२५५३), अशोक नागरे (२१०६), बबनराव सानप (२०९९), नामदेव काकड (२०६८), नारायण काकड (२०४९). परिवर्तन : लक्ष्मणराव जायभावे (२२३५).

नाशिक तालुका शहर (४ जागा) : प्रगती : प्रकाश घुगे (२५४१), प्रल्हाद काकड (२४३९), बाळासाहेब धात्रक (२३२५), परिवर्तन : गोकुळ काकड (२२२२).

सिन्नर तालुका (३ जागा) : प्रगती : जयंत आव्हाड (२४८१), समाधान गायकवाड (२४७३), हेमंत नाईक (२३३९).

निफाड तालुका (३ जागा) : प्रगती : पुंजाहरी काळे (२५०४), बंडू दराडे (२३५३), परिवर्तन : उद्धव कुटे (२३३६), महिला राखीव (२ जागा), प्रगती : रेखा कातकडे (२५५१), नंदा भाबड (२४१६).

दिंडोरी तालुका (३ जागा) : प्रगती : शरद बोडके (२५९३), राजेश दरगोडे (२३५०), परिवर्तन : सुभाष आव्हाड (२३०४).

येवला तालुका (२ जागा) : प्रगती : रमेश वाघ (२३३७), संपत वाघ (२३२३).

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT