Ashok Kharat Pudhari
नाशिक

Ashok Kharat case | 'आमचे आयुष्य उद्ध्वस्त करून तू काय मिळवलेस?' भोंदू अशोक खरातची पीडितांकडून 'धुलाई'

देव मानलेल्याचा खरा चेहरा समोर आल्यानंतर संतापाचा उद्रेक

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : निखिल रोकडे

देवाचा मुखवटा धारण करून महिलांचा विश्वास संपादन केल्याचा आणि त्यानंतर लैंगिक शोषण व आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या भोंदू अशोक खरातविरोधात पीडित महिलांच्या मनात कित्येक दिवसांपासून धगधगत असलेला संताप अखेर चौकशीदरम्यान समोरासमोर उफाळून आल्याची धक्कादायक माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. 'ज्याला आम्ही देव मानले, त्यानेच आमचा विश्वासघात केला.

आमचे आयुष्य उद्ध्वस्त करून तू काय मिळवलेस? असा सवाल करत काही पीडित महिलांनी चौकशीदरम्यान खरातची चांगलीच 'धुलाई' केल्याची चर्चा आहे. खरातवर लैंगिक शोषण आणि आर्थिक फुटताच त्यांनी आपला रोष थेट खरातसमोर व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. फसवणुकीचे गंभीर आरोप आहेत. त्याच्या कथित कृत्यांमुळे अनेक महिलांच्या आयुष्यावर विपरीत परिणाम झाल्याचा आरोप असून, या घटनांची चौकशी सुरू आहे. तपासाच्या ओघात पीडित महिलांचा खरातशी सामना झाल्यानंतर त्यांच्या मनात वर्षानुवर्षे साचलेला संताप अनावर झाल्याचे सांगितले जाते.

अशोक खरातला १८ मार्च रोजी नाशिकमधील कर्मयोगीनगर, गोविंदनगर परिसरातून ताब्यात घेतले होते. त्याच्याविरुद्ध नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे येथे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सध्या तो न्यायालयीन कोठडीत असून, संबंधित प्रकरणांमध्ये तपासाची प्रक्रिया पुढे सरकत आहे. काही प्रकरणांत दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. लैंगिक शोषणाच्या प्रकरणांचा सखोल तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. आर्थिक व्यवहार आणि फसवणुकीच्या आरोपांच्या अनुषंगाने अंमलबजावणी संचालनालयानेही तपासात प्रवेश केला आहे.

सुरुवातीच्या काळात खरात ईडीच्या ताब्यातही होता. त्याच्या पत्नीविरुद्धही शिर्डीतील भूखंडाशी संबंधित प्रकरणात कारवाई झाली असून, न्यायालयीन प्रक्रियेनंतर तिला जामीन मिळाला आहे.

खरातविरोधातील प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याने आरोपांची सत्यता आणि दोष निश्चित करण्याचा अधिकार न्यायालयालाच आहे. मात्र, तपासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात पीडित महिलांच्या मनात साचलेला संताप किती तीव्र होता, याची झलक या घटनेच्या चर्चेतून समोर येत आहे. कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या खरातविरोधात न्यायालयीन लढाई सुरू असतानाच, पीडितांच्या मनातील आक्रोशही आता उघडपणे समोर येत असल्याचे चित्र आहे. भोंदू खरात महिला लैंगिक शोषण प्रकरणांची सुनावणी सुरू झाली आहे. या संदर्भात ज्येष्ठ विधीज्ञ सरकारी वकील उज्ज्वल निकम सरकारी पक्षाकडून घटना लढविणार आहेत.

भोंदू अशोक खरातने जामिनासाठी अर्ज केलेला आहे. त्यास उज्ज्वल निकम यांनी नाशिकमध्ये सुनावणीदरम्यान कडाडून विरोध केला. निकम यांच्यासारख्या गाजलेल्या सहकारी वकील व मोठ्या गुन्ह्यांचा अनुभव पाठीशी असलेल्या अशोक खरात व त्यांच्या कुटुंबीयांमध्येही आता एकप्रकारे धास्ती निर्माण झाली आहे.

अॅड. उज्ज्वल निकमांमुळे खरात धास्तावला

भोंदू खरातने जामिनासाठी अर्ज केलेला आहे, त्यास निकम यांनी नाशिकमध्ये सुनावणीदरम्यान कडाडून विरोध केला. उज्ज्वल निकम यांच्यासारख्या गाजलेल्या व मोठ्या गुन्ह्यांचा अनुभव पाठीशी असलेल्या वकिलामुळे भोंदू खरातच्या मनात आता आपले काही खरे नाही, अशी धास्ती निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT