सिन्नर (नाशिक) : सिन्नर कृषि उत्पन्न बाजार समितीत खरेदी केलेला सुारे 3 हजार क्विंटल कांदा व 500 क्विंटल मका शेडमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने भिजला. त्यात कांद्याचे सुारे 30 ते 35 लाख रुपये व मक्याचे सुारे दहा ते बारा लाख रुपये असे सुमारे 50 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
सुट्टीचा दिवस व वादळी वार्यासह आलेल्या पावसात शेतमाल भिजल्याने व्यापार्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागल्याची माहिती व्यापार्यांचे प्रतिनिधी संचालक संचालक सुनील चकोर यांनी दिली. बाजार समितीचे सचिव विखे, जेष्ठ कांदा व्यापारी बाळासाहेब चकोर, सुनील व सतीश चकोर दिलीप खिंवसरा आदींनी भिजलेल्या शेतमालाची पाहणी केली.
रविवारी (दि. 25) सुमारे दोन तासात 144 मि.मी. एवढ्या ढगफुटी सदृश पावसाने बाजार समितीच्या आवारात पाणीच पाणी झाले. ते निचरा व्हायला जागा नसल्याने, हे पाणी व्यापार्यांचा खरेदी केलेला शेतमाल साठविलेल्या शेडमध्ये घुसले.