Nashik Municipal Corporation 
नाशिक

Nashik Municipal Corporation Action | अनधिकृत होर्डिंग्ज आणि बॅनर्सवर महापालिकेचा दणका; पहिल्याच दिवशी 123 फलक जप्त

Nashik Municipal Corporation Action | पहिल्याच दिवशी कारवाईत सहा विभागांतून 123 फलक जप्त

पुढारी वृत्तसेवा

नाशिक (पुढारी वृत्तसेवा):

शहरातील सार्वजनिक ठिकाणे, प्रमुख रस्ते आणि चौकांमध्ये विनापरवानगी होर्डिंग्ज, बॅनर्स आणि फ्लेक्स लावून विद्रूपीकरण करणाऱ्यांविरोधात महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सोमवारपासून (दि. १६) सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेच्या पहिल्याच दिवशी शहरातील सहा विभागांतून तब्बल १२३ अनधिकृत फलक जप्त करण्यात आले.

ही मोहीम यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याची माहिती अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा दखणे यांनी दिली. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात शुभेच्छा देणारे बॅनर्स, होर्डिंग्ज आणि फ्लेक्स मोठ्या प्रमाणावर लावण्यात आले होते.

सार्वजनिक ठिकाणे, प्रमुख रस्ते, चौक तसेच वाहतूक मार्गावर लावण्यात येणाऱ्या या फोलकांमुळे शहराच्या सौंदर्याला बाधा पोहोचण्याबरोबरच वाहतुकीलाही अडथळे निर्माण होत होते. काही ठिकाणी वाहनचालकांची दृश्यमानता कमी होऊन अपघातांचा धोका वाढत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत होत्या.

या तक्रारींची दखल घेत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील सहाही विभागांत पथके तैनात करून कारवाई केली. यामध्ये नाशिक पूर्व विभागात सर्वाधिक २८ फलक जप्त करण्यात आले. पंचवटीत २३, सातपूरमध्ये २०, नाशिकरोड आणि नाशिक पश्चिममध्ये प्रत्येकी १८, तर नवीन नाशिक विभागात १६ अनधिकृत फलक हटवण्यात आले.

परवानगीशिवाय फलक लावल्यास कारवाई

शहराचे विद्रूपकरण रोखण्यासाठी अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्स आणि फ्लेक्सविरोधातील मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कायदेशीर तसेच दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपायुक्त सुवर्णा दखणे यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT