विलंबाने दाखल झालेला मान्सूनने संपूर्ण राज्य व्यापले असून सगळीकडे पेरणीसाठी सुरुवात झाली आहे pudhari news network
नाशिक

नाशिक : राज्यात यंदा पेरणी क्षेत्रात दोन टक्के घट

कृषी विभाग : जून अखेर राज्यात १५५.६४ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी

पुढारी वृत्तसेवा
नाशिक : जिजा दवंडे

नाशिक : यंदा विलंबाने दाखल झालेला मान्सूनने संपूर्ण राज्य व्यापले असून पेरणी करण्याइतपत बहुतांशी सर्वच भागांत पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पेरणीची कामे जवळपास आटाेपली आहेत. त्यामुळे जून अखेर राज्यात १५५.६४ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असून ती मागील वर्षीच्या (१५८.६० लाख हेक्टर) तुलनेत सुमारे दोन टक्के कमी झाल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे.

जून अखेर राज्यात १५५.६४ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण

यंदा तृणधान्ये, कडधान्ये, ऊस आणि कापूस पिकांच्या क्षेत्रात मात्र घट झाली आहे.

मान्सूनचे राज्यात मान्सून वेळेवर दाखल होऊनही त्याचा पुढील प्रवास अत्यंत संथगतीने होत असल्याने पिकांवर परिणाम होत आहे.

शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा हंगाम म्हणून खरीपाकडे पाहिले जाते. कोरडवाहू शेती असलेले लाखो हेक्टर क्षेत्र हे पावसाच्या पाण्यावर आवंलबून असल्याने तसेच पावसाळ्यात वाहणाऱ्या नदी- नाले तसेच विहरी, तलावांच्या पुनर्रभरणावरच रब्बी पिकांचे भवितव्य अवलंबून असल्याने सर्वांचेच लक्ष ‌खरीपातील प्रजन्यमानाकडे लागलेले असते. यंदा मान्सूनचे राज्यात मान्सून वेळेवर दाखल होऊनही त्याचा पुढील प्रवास अत्यंत संथगतीने राहिल्याने जवळपास १५ ते २० दिवस शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा करावी लागली.

Kharif season

मात्र, त्यानंतर राज्यात काही तालुके वगळता जवळपास सर्वच भागांत पेरण्या करण्याइतपत पाऊस झाल्याने पेरण्याची कामे पूर्ण झाली आहेत. असे असले तरी मागील वर्षीच्या तुलनेत यंदा खरीप हंगामाचे क्षेत्र दोन टक्यांनी घटले आहे. यात अत्यंत कमी पाऊस झालेल्या तालुक्याचा समावेश आहे. विशेष म्हणजे यंदा तेलबिया पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.

Kharif season

pudhari news networkतर तृणधान्ये, कडधान्ये, ऊस आणि कापूस पिकांच्या क्षेत्रात मात्र घट झाली आहे. यंदा एकूण तृणधान्य पेरणीचा विचार केल्यास गतवर्षी २०२२-२३ मध्ये ३,१२१.५० हेक्टर क्षेत्रावर तृनधान्याची पेरणी करण्यात आली होती. ती यंदा २०२३-२४ मध्ये ३,०३६.५० इतकी झाली आहे. तर २०२२-२३ मध्ये १,९२५.२७ हेक्टर क्षेत्रावर कडधान्यांची लागवड झाली होती. ती यंदा २०२३-२४ मध्ये १,६११.०४ वर आली आहे. तेलबियांची २०२२-२३ मध्ये ५,०८४.९५ क्षेत्रावर झालेली लागवड यंदा २०२३-२४ मध्ये ५,२४५.०५ वर आली आहे. विशेष म्हणजे यंदा ऊसाचे क्षेत्र घटले आहे. २०२२-२३ मध्ये असलेले १,४८७.८४ हेक्टरवरील ऊस क्षेत्र यंदा २०२३-२४ मध्ये १,४३७.०१ इतके खाली आहे.

Kharif season

ऊस, कापूस क्षेत्रात देखील घट

राज्यात पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात घेतलेले जाणारे ऊसाचे क्षेत्र यंदा मोठ्या प्रमाणात घटले. मराठवाड्यात कमी पाऊसकाळ तसेच भूजलपातीळीत झालेली घट झाल्याने आणि ऊसाला मोठ्या प्रमाणात पाणी लागत असल्याने ऊसाचे क्षेत्र घटले आहे. विशेष म्हणजे ऊसासाठी प्रसिद्ध असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले आहे. यामागे अपेक्षित भाव न मिळणे, कामगार व मशीनअभावी वेळेवर तोडणी न झाल्याने वजन घटून उत्पादनात घट होत असल्याने या भागातील उत्पादक शेतकरी घटल्याचे निरीक्षक कृषी विभागाने नोंदविले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT