Road Accident Death  pudhari photo
नाशिक

Nashik Accident Death | येवला उपजिल्हा रुग्णालयासमोर भीषण अपघात; भरधाव डम्परच्या धडकेत कोपरगावच्या दोघांचा जागीच मृत्यू

Nashik Accident Death | येवला उपजिल्हा रुग्णालयासमोर भीषण अपघात

पुढारी वृत्तसेवा

येवला : पुढारी वृत्तसेवा
उपजिल्हा रुग्णालयासमोर भरधाव डम्परने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात डम्परच्या चाकाखाली सापडल्याने दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
मृतांची नावे आसिफ नूर मोहम्मद शेख (३६) आणि सैफ रफिक शेख (१५, दोघे रा. संजयनगर, कोपरगाव) अशी आहेत.

हे दोघे दुचाकी (क्रमांक: एमएच १७, बीडब्ल्यू ५८६४) वरून जाताना त्यांना उपजिल्हा रुग्णालयासमोर (एमएच १२, एलटी ९९८०) या भरधाव डम्परने चिरडले. हा अपघात इतका भीषण होता की, डम्परच्या चाकाखाली आल्यामुळे दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

येवला पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले. डम्परचालकावर गुन्हा दाखल झाला असून, तपास शहर पोलिस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT