Simhastha Kumbh Mela 
नाशिक

Simhastha Kumbh Mela | राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे त्र्यंबकनगरीला कडक सुरक्षा व्यवस्थेत पोलिस छावणीचे स्वरूप

Simhastha Kumbh Mela | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबक भेटीमुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्र्यंबकनगरीला गुरुवारी (दि. २९) सकाळपासून पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे.

पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबक भेटीमुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्र्यंबकनगरीला गुरुवारी (दि. २९) सकाळपासून पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे.

मुख्य मार्गासह सर्वत्र पोलिसांचा खडा पहारा उभा करण्यात आला आहे. दुपारी ३ च्या सुमारास पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुशावर्त तीर्थास भेट दिली व ध्वजारोहण स्थळाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. राष्ट्रपती आणि मान्यवर नेत्यांचा दौरा असल्यामुळे प्रमुख मार्गावरील दुकाने दोन दिवस बंद ठेवणार आहेत. आठवडे बाजार भरणार नाही याची अधिसूचना निघाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT