Simhastha Kumbh Mela 2026  file photo
नाशिक

Simhastha Kumbh Mela 2026 | जेथे गोदावरी नाही, तेथे स्नानाचा अट्टाहास कशासाठी ?

Simhastha Kumbh Mela 2026 | घाट रस्त्यांमुळे बाधित होणारे शेतकरी साखळी आंदोलनाला बसले आहेत. यात बडा उदासीन आखाड्याचे महंत राममुनीदेखील सहभागी झाले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा

घाट रस्त्यांमुळे बाधित होणारे शेतकरी साखळी आंदोलनाला बसले आहेत. यात बडा उदासीन आखाड्याचे महंत राममुनीदेखील सहभागी झाले आहेत. गोदावरीवर घाट बांधणे आणि सिंहस्थ कुंभमेळ्यात तेथे अमृतस्नान करण्यास त्यांचा प्रारंभापासून विरोध आहे. याबाबत त्यांनी वेळोवेळी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, शासनाने प्रतिसाद दिला. नाही.

जेथे गोदावरी नाही तेथे स्नानाचा अट्टाहास कशासाठी असा त्यांनी प्रश्न केला आहे. शेतकऱ्यांच्या साखळी आंदोलनास तीन आठवडे उलटले आहेत. याबाबत विधिमंडळात प्रश्न उपस्थित होऊनही निर्णय झालेला नाही.

महंत राममुनी यांनी कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नाही. शासनाने सर्वांना २५ लाख रुपये प्रतिगुंठा भाव दिला, तर न्याय होईल. जेथे गोदावरी नाही तेथे स्नानाचा अट्टाहास कशासाठी असा त्यांनी प्रश्न केला आहे. नदीपात्राची दुरवस्था स्पष्ट करणारा व्हिडिओ समाज माध्यमात टाकला आहे.

कोण आहेत महंत राममुनी?

त्र्यंबकेश्वर येथे शैव साधूंचे १० आखाडे आहेत. महंत राममुनी हे बडा उदासीन आखाड्याचे महंत आहेत. बडा उदासीन आखाडा मोठा आखाडा आहे. बडा उदासीन आखाड्यातील साधूंची संख्या लक्षावधी आहे. योगगुरू रामदेव बाबा याच आखाड्याशी संबंधित आहेत. त्र्यंबकेश्वर येथे बड़ा उदसीन आखाड्याची जमीन १९९० च्या कुंभमेळ्यात एसटी डेपोसाठी देण्यात आली.

मात्र, प्रत्यक्षात विभागाने डेपो केला नाही. तेव्हापासून जागेचा वापर सिंहस्थ बसस्थानक म्हणून होतो. आखाड्याची काही जमीन बसस्थानकालगत आहे. कुंभमेळ्यात आखाड्याचे आचार्य वास्तव्य करतात. या ठिकाणी अन्नछत्र चालविले जाते कथा प्रवचन होते.

शासनाने गोदावरी नदीवर घाट बांधण्याचे ठरविले आहे. त्यासाठी बडा उदासीन आखाड्याने जमीन देण्यास नकार दिला आहे. मागील सिंहस्थात येथे घाट बांधण्यात आले. मात्र, त्यांचा वापर झाला नाही. आजमितीस घाटाची अवस्था गटारीत झाली आहे. साधूसंत, भक्तांच्या भावनेला ठेच पोहोचवणारा आहे. महंत राममुनी यांनी गोदावरीवर भक्तांच्या स्नानाची व्यवस्था करायची असल्यास चक्रतीर्थावर घाट बांधून व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे.

बसस्थानकालगतच्या घाटांची अवस्था दयनीय आहे. या घाटातून गोदावरी वाहते असे सांगितल्यामुळे भक्तांच्या भावनांना धक्का बसतो. तरी शासन आपले म्हणणे पुढे रेटत आहे. या घाटावर पेंडॉल टाकत आंदोलन करण्याचा मानस आहे. - महंत राममुनी महाराज, बडा उदासीन आखाडा, त्र्यंबकेश्वर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT