Death Pudhari
नाशिक

Nashik Finance Torture | कर्ज वसुलीच्या छळाला कंटाळून तरुणाचे विषप्राशन

Nashik Finance Torture | आडगाव हद्दीतील जत्रा हॉटेल परिसरात राहणाऱ्या तरुणाने कारमध्ये विषप्राशन केल्याची धक्कादायक घटना घडली.

पुढारी वृत्तसेवा

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा

आडगाव हद्दीतील जत्रा हॉटेल परिसरात राहणाऱ्या तरुणाने कारमध्ये विषप्राशन केल्याची धक्कादायक घटना घडली. महेश दादासाहेब शिंदे (२७) असे या तरुणाचे नाव असून, त्याला गंभीर अवस्थेत सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश शिंदे हे मूळ शिंगवे (ता. नांदगाव) येथील रहिवासी असून, गेल्या आठ वर्षांपासून जत्रा हॉटेल परिसरात वास्तव्यास असून, ट्रॅव्हल्स व्यवसायाशी संबंधित आहे.

त्यांनी काही वर्षांपूर्वी एका फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. संबंधित फायनान्स कंपनीकडून वारंवार मानसिक त्रास दिला जात आहे. तसेच फायनान्स कंपनीने त्यांची कार ताब्यात घेतल्याचा दावा त्यांच्या नातेवाइकांनी केला. याच मानसिक तणावातून शिंदे यांनी कारमध्ये विषप्राशन केल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

शिंदे यांना तातडीने सह्याद्री रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणाची माहिती मिळताच आडगाव पोलिस रुग्णालयात दाखल झाले असून, पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, वाहन चालक युनियनचे पदाधिकारी व चालक मोठ्या संख्येने रुग्णालयाबाहेर जमा झाले होते. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT