Traffic Wardens Pudhari
नाशिक

Nashik Traffic Diversion | गोदाघाट परिसरातील वाहतूक मार्गात बदल

Nashik Traffic Diversion | धर्मध्वज मिरवणूक, ध्वजारोहण अन् गोदाआरतीसाठी ३० व ३१ ला विशेष व्यवस्था:

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ कुंभमेळा २०२७ निमित्त गोदाघाटवर धर्मध्वज मिरवणूक, धर्मध्वज ध्वजारोहण सोहळा आणि गोदाआरती या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमांना साधु-महंत, व्हीव्हीआयपी, व्हीआयपी, राजनीतिक नेते तसेच नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गर्दीचे नियोजन, वाहतूक कोंडी टाळणे आणि नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन नाशिक शहर वाहतूक पोलिसांनी विशेष वाहतूक अधिसूचना जारी केली आहे.

पोलिस उपायुक्त (मुख्यालय/वाहतूक) चंद्रकांत गवळी यांनी ही अधिसूचना जारी करत ३० ऑक्टोबरला धर्मध्वज मिरवणूक आणि ३१ ऑक्टोबरला धर्मध्वज ध्वजारोहण सोहळ्यासाठी विविध मार्गावर वाहतूक बदल केले आहेत. गोदाआरती कार्यक्रमासाठीही काही मार्गावर प्रवेश बंद ठेवणार आहेत. या कालावधीत संबंधित मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी लागू राहणार असून, काही ठिकाणी नो-पार्किंग आणि नो-वेहिकल झोन घोषित केले आहेत.

वाहतूक पोलिसांनी निश्चित केलेल्या पर्यायी मार्गाचा वापर नागरिकांनी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. वाहतूक अधिसूचनेनुसार, नमूद प्रवेशबंदीच्या मार्गावर नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. पोलिस सेवेत असलेली वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका आणि अग्निशमन दलाच्या वाहनांना या निर्बंधांतून सूट दिली आहे. अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

30 ऑक्टोबर : धर्मध्वज मिरवणूक

वाहतुकीसाठी मार्ग बंद:

  • तपोवन मैदान ते आव्हाड लॉन्स, टी-कॅर्नर ते तपोवन क्रॉसिंग.

  • पंचवटी परिसरातील काठ्या मारुती चौक ते देवी चौक.

  • दिल्ली दरवाजा, नेहरू चौक, धुमाळ पॉइंट आणि रविवार कारंजा परिसरातील संबंधित मिरवणूक मार्ग.

  • अशोकस्तंभ ते रविवार कारंजा.

  • टिळक पथ ते धुमाळ पॉइंट.

  • मालवीय चौक ते मखमलाबाद नाका परिसरातील अधिसूचित मार्ग.

३१ ऑक्टोबर : धर्मध्वज ध्वजारोहण सोहळा व गोदाआरती कार्यक्रम


वाहतुकीसाठी मार्ग बंद:

  • अशोकस्तंभ ते रविवार कारंजा.

  • रविवार कारंजा ते मालेगाव स्टँड.

  • मखमलाबाद नाका ते रामकुंड.

  • शनी चौक ते रामकुंडाकडे जाणारा मार्ग.

  • रामसेतू पुलावरून जाणारा संबंधित मार्ग.

  • गोदाघाट परिसरातील अधिसूचनेत नमूद केलेले प्रवेशमार्ग.

  • गोदाआरती कार्यक्रमासाठी: रामसेतू पुलावरून जाणारा मार्ग, रविवार कारंजा ते अहिल्यादेवी होळकर पूल ते मालेगाव स्टँड, मखमलाबाद नाका ते रामकुंड व कपालेश्वर मंदिर परिसर, शनी चौक ते रामकुंडाकडे जाणारा मार्ग, तसेच गोदाघाट परिसरातील अधिसूचित प्रवेशमार्ग बंद राहतील.

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग (धर्मध्वज मिरवणूक व संबंधित कार्यक्रमांसाठी):

  • दिंडोरी नाका - पेठ नाका सिग्नल - मखमलाबाद नाका - गोदापार्क - गजानन पेट्रोल पंप - चोपडा लॉन्स - गंगापूर नाका - इंद्रप्रस्थ.

  • सीबीएस - मेहेर सिग्नल - अशोकस्तंभ - जुना गंगापूर नाका - गजानन पेट्रोल पंप - ड्रीम कॅन्सल - फडोळ चौक - कृषी सिग्नल - तारवाला सिग्नल - अमृतधाम चौक - मिर्ची चौक सिग्नल.

  • पेठ नाका - कृषी उत्पन्न बाजार समिती सिग्नल - तारवाला सिग्नल - अमृतधाम चौक - मिर्ची चौक सिग्नल.

  • दिंडोरी नाका - तारवाला सिग्नल - अमृतधाम चौक - मिर्ची चौक सिग्नल.

पार्किंग व नो-पार्किंग व्यवस्था:


निर्धारित पार्किंग ठिकाणे:

  • संभाजी महाराज गार्डन, गंगापूर रोड परिसर.

  • अशोकस्तंभ परिसरातील निर्धारित पार्किंग.

  • छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम.

  • शिगण स्वॅयेर, अशोक स्तंभ परिसर.

  • बी. डी. भालेकर मैदान.

  • पंचवटी परिसरात शिंदे मळा व संबंधित लॉन्स येथे अधिसूचनेनुसार पार्किंग.

नो-पार्किंग झोन:

  • दिंडोरी नाका ते पंचवटी कारंजा.

  • काठ्या मारुती चौक ते देवी चौक ते धनदई लॉन्स.

  • रविवार कारंजा ते रेडक्रॉस सिग्नल ते शालिमार.

  • मेहेर सिग्नल ते रेडक्रॉस सिग्नल.

  • खडककाळी सिग्नल ते शालिमार.

  • ट्रॅक्टर हाउस ते नानावली पोलीस चौकी ते अमरधाम रोड.

  • कार्यक्रमाच्या ठिकाणी पायी जाण्याच्या मार्गावर तसेच पार्किंगच्या रस्त्यावर.

पंचवटी परिसरात पार्किंगनंतर पायी जाण्यासाठी मार्ग:

  • शनी चौक ते सरकारवाडा पोलिस चौकी.

  • नागचौक ते सरकारवाडा चौक.

  • देवी मंदिर चौक ते सरकारवाडा चौक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT