tomatoes  file photo
नाशिक

Tomato Rate : टोमॅटोचे भाव वधारले, किंमत किती? नाशिकच्या टोमॅटोला परराज्यात मागणी

पूरस्थिती आदी कारणांनी टोमॅटोला सरासरी ५०० रुपये प्रति क्रेट भाव

पुढारी वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत : अर्ली टॉमॅटो भाव खाऊ लागला आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोला प्रतिक्रेट सरासरी ५०० रुपये भाव मिळत आहे. सद्या बाजार समितीत पाच ते आठ हजार क्रेटमधून टोमॅटोची आवक होत असून, त्यास प्रतवारीनुसार किमान ५० रुपये ते कमाल ६११ रुपये एवढा दर मिळत आहे. मागणी वाढल्यास हे दर पुन्हा ऐतिहासिक उच्चांक गाठू शकतात, असा अंदाज आहे. (Traders are expecting that the market price of tomatoes will remain stable.)

दरवर्षी साधारणपणे १५ ऑगस्टपासून टोमॅटो हंगामाला प्रारंभ होतो. यंदा मात्र अनेक शेतकऱ्यांनी अर्ली टोमॅटोचे उत्पादन घेतल्याने जूनपासूनच टोमॅटोची आवक होत आहे. सध्या मर्यादीत आवक असल्याने सरासरी बाजारभाव प्रतिक्रेट ५०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. मूळ हंगामास सुरू झाला असून, येत्या दिवसांत ही आवक लाखभर क्रेट्सपर्यंत वाढू शकते.

स्थानिक आणि परराज्यातील ४० ते ५० व्यापारी टोमॅटोची खरेदी करीत आहेत. प्रामुख्याने मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, दिल्ली, आग्रा या ठिकाणी टोमॅटोची मागणी मोठ्या प्रमाणात असून नाशिकच्या टोमॅटोला प्रथम प्राधान्य येथे दिले जात आहे. काही राज्यांमध्ये अतिपर्जन्य व पूरस्थितीमुळे नाशिकच्या टोमॅटोला परराज्यात मागणी वाढली आहे.

टोमॅटोचे बाजारभाव टिकून राहतील

पिंपळगाव बाजार समितीमध्ये तीन ऑगस्टला आठ हजार क्रेट्स, चार ऑगस्टला ४,०३४ क्रेट्स अशी आवक झाली होती. सध्या बाजार समितीलगतच्या जागेत व्यापारी वर्ग दाखल होत असून टोमॅटो शेड बांधण्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यात ही मुसळधार पाऊस हाेत राहिल्यास यंदादेखील टोमॅटोचे बाजारभाव टिकून राहतील, अशी अपेक्षा व्यापारी वर्गातून व्यक्त केली जात आहे.

मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान या राज्यातून टोमॅटोला मागणी आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने, नाशिकचा टोमॅटो गुणवत्तेच्या आधारावर भाव मिळवत आहे. भविष्यात ही बाजारभाव टिकून राहतील, अशी अपेक्षा आहे.
गोरख गांगुर्डे, टोमॅटो, व्यापारी, पिंपळगाव, नाशिक.
सध्या मागणीच्या तुलनेमध्ये आवक कमी असतानाही अपेक्षित बाजारभाव मिळत नाही. मात्र व्यापाऱ्यांची संख्या वाढल्यास बाजारभावामध्ये नक्कीच वाढ होऊ शकते, असा शेतकऱ्यांचा कयास आहे.
मोहन शिंदे, टोमॅटो उत्पादक, पिंपळगाव, नाशिक.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT