मखमलाबाद : दिवाळीनंतर टोमॅटोला चांगला भाव मिळत असून, ३०० ते ४५० रुपये क्रेट या दराने टोमॅटोची विक्री होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे.
दिवाळीपूर्वी पाऊस पडल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या टोमॅटो पिकाचे नुकसान झाले होते. तसेच फळांना डाग पडल्याने फळ विक्रीसाठी शेतकऱ्यांना आणता येत नव्हते. सध्या बाजारपेठेत बऱ्याच प्रमाणात टोमॅटोची आवक होत आहे. त्यात शेतकऱ्यांना बऱ्यापैकी बाजारभाव मिळत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. गिरणारे गावात टोमॅटोचे मोठे मार्केट असून, येथून थेट इंदूर, पंजाब, दिल्ली, कर्नाटक, मध्य प्रदेश आदी ठिकाणी टोमॅटोची निर्यात केली जाते.