Vat Purnima
नाशिक : वडाला धागा बांधून पतीच्या आयुष्याची दोरी बळकट होऊ दे, अशी प्रार्थना करण्याचा सण वटपौर्णिमा यंदा महिलांना दोन दिवस साजरी करता येणार आहे.
यंदा मंगळवारी (दि.१०) साडेअकरानंतर पाैर्णिमेला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे या दिवशी सकाळी वटपुजन न करता दुपारनंतर महिला वटपूजन करणार आहेत. बुधवारी (दि.११) सुर्याने पाहिलेली तिथी याही दिवशी दुपारी १.१५ वाजेपर्यंत पौर्णिमा असणार आहे. त्यामुळे यंदा दोन दिवस सुवासिनी महिलांना वटपूजनाची संधी मिळणार आहे.
वटपौर्णिमेचा उपवास करुन सुवासिनी वडाला धागा गुंडाळून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते. भ्रदायोग असला तरी वटपौर्णिमा करता येते, अभ्यासकांनी स्पष्ट केले. दरम्यान, वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला बाजारात महिलांची भाज्या, आंबे खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. पूजेत आंब्याचा वापर केला असल्याने आंब्याचे दरही वाढले आहेत.
मंगळवारी (दि.10) सकाळी साडेअकरा वाजेपासून बुधवारी दुपारी १.१५ या काळात महिलांना वटपूजन करता येणार आहे. याबाबत संभ्रम नसावा. भ्रदायोग असला तरी वटपाैर्णिमा करता येणार आहे. ज्या सुवासिनींना मंगळवारी अन्य कारणांनी वटपूजन करणे जमणार नाही. त्यांनी बुधवारी दुपारी एक वाजेपर्यंत करता येईल.गोपाळ शास्त्री जोशी, पुरोहित, नाशिक