Tirupati Shirdi Railway Pudhari Photo
नाशिक

Tirupati Shirdi Railway : 'तिरुपती- शिर्डी- तिरुपती' नवीन साप्ताहिक रेल्वेला मंजुरी

मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्याला यश

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून तिरुपती- साईनगर शिर्डी- तिरुपती या नवीन साप्ताहिक रेल्वेला रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली आहे. यामुळे येवला व परिसरातील नागरिकांना तिरुपती व शिर्डी या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या नवीन रेल्वेची सुविधा उपलब्ध होणार आहे.

तिरुपती आणि शिर्डी या दोन प्रमुख आध्यात्मिक स्थळांदरम्यान प्रवास करणाऱ्या लाखो भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता, या मार्गावरील रेल्वे सेवांची संख्या वाढवण्याची तातडीची गरज होती. हाच मुद्दा अधोरेखित करत मंत्री भुजबळ यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्राद्वारे शिर्डी तिरुपती रेल्वेच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी सातत्याने केली होती. या मागणीला अखेर सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, ९ डिसेंबर २०२५ पासून १७४२५/१७४२६ तिरुपती-साईनगर शिर्डी या नवीन साप्ताहिक रेल्वेगाडीच्या उद्घाटनाची घोषणा करण्यात आली आहे.

वाढीव फेऱ्या उपलब्ध होतील

उत्तर महाराष्ट्रातून तिरुपतीसाठी आतापर्यंत केवळ एका साप्ताहिक गाडीवर अवलंबून असलेल्या प्रवाशांना आता वाढीव फेऱ्या उपलब्ध होतील. ही रेल्वे शिर्डीहून सुटणार असल्याने तिकीट उपलब्धता वाढेल आणि मोठ्या प्रतीक्षा यादीची समस्या अत्यंत कमी होईल. शिर्डी-तिरुपती रेल्वेला नगरसूल रेल्वे स्टेशनवर थांबा मिळाल्याने येवला मतदारसंघातील स्थानिक रहिवाशांपासून ते दूरवरून येणाऱ्या पर्यटकांसाठी तिरुपतीला जाण्याची सोय उपलब्ध होईल.

धार्मिक पर्यटनात मोठी वाढ

वाढीव रेल्वे सुविधा उपलब्ध झाल्यामुळे तिरुपती आणि शिर्डी या दोन्ही ठिकाणांच्या धार्मिक पर्यटनात मोठी वाढ होईल, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही थेट चालना मिळेल. ०७६३७/०७६३८ शिर्डी तिरुपती हॉलिडे स्पेशल आता नियमित गाडीमध्ये परावर्तित झाल्याने आकारण्यात येणारे १.३ पट प्रवासी भाडे आता कमी होईल तसेच सेवागुणवत्तेवरही सकारात्मक परिणाम होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT