नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जालना ते जळगाव दरम्यान नवीन रेल्वे लाईन प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. हा प्रकल्प 174 किलोमीटर लांबीचा असून युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ अजिंठा लेण्यांशी जोडणीला चालना देणारा आहे. यामुळे मराठवाड्यापासून उत्तर महाराष्ट्रापर्यंत जलद मार्ग उपलब्ध होईल. तसेच सिल्लोड या भागाची औद्योगिक वाढ होण्यास मदत होईल.
प्रकल्पाची एकूण किंमत : ₹7,106 कोटी.
राज्य सरकारची सहभागिता : 50%
रोजगार निर्मिती : या प्रकल्पामुळे 60 लाख मनुष्य-दिवसांचे रोजगार निर्माण होतील.
जमिनीचा संपादन : प्रकल्पासाठी 935 हेक्टर जमीन संपादित केली जाईल.
CO2 उत्सर्जन बचत : प्रकल्पामुळे 54 कोटी किलो CO2 उत्सर्जन वाचवले जाईल, जे 2.2 कोटी झाडांच्या लागवडीच्या समतुल्य आहे.
हा प्रकल्प परिसराच्या विकासाला चालना देईल आणि विशेषतः सिल्लोड सारख्या भागांमध्ये औद्योगिक वाढ घडवून आणेल.