नाशिक : आमच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार का केली? अशी कुरापत काढून चौघांनी मिळून युवकाला मारहाण करीत गंभीर दुखापत केली.
याप्रकरणी सुमित नवनाथ वायचळे (२३, रा. राजराजेश्वरी चौक, जेल रोड) याने नाशिक रोड पोलिस ठाण्यात संशयित हेमराज गायकवाड, पेन्या उर्फ वैभव जाधव (दोघे रा. जेल रोड), मॅडी शिंदे (रा. देवळाली गाव) व भूपेश गायकवाड (रा. जेल रोड) यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली. संशयितांनी बुधवारी (दि. १७) रात्री 11 च्या सुमारास जेल रोड येथील मॉडेल काॅलनी परिसरात कुरापत काढून शिवीगाळ करीत मारहाण केली. कोयता, चाकूने वार करून सुमितला गंभीर दुखापत केली. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस अधिक तपास करीत आहेत.