नाशिक : गिरणारे माळरानावर 'सीड्सबॉल्स' रोपण उपक्रमप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी जलज शर्मा. समवेत पंकज गर्ग, बिजू गोपीनाथ आदी. (छाया : हेमंत घोरपडे)
नाशिक

Nashik News | गिरणारे रानात चक्क ड्रोनद्वारे हाेतेय बीजारोपण

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) नाशिक वनविभागाच्या सहकार्याने ड्रोनद्वारे सीड्सबॉल्सचे जमिनीत रोपण करून वापरून नापीक झालेल्या जमिनी वृक्षाच्छादित करणार आहेत. सोमवारी (दि. २२) गिरणारे येथील वनविभागाच्या अख्यत्यारीतील १०० हेक्टर माळरानावर दोन लाख सीड्सबॉल्सचे रोपण करण्यात आले. (Bharat Petroleum Corporation Limited (BPCL))

जिल्हाधिकारी जलज शर्मा, 'बीपीसीएल'चे कार्यकारी संचालक (पाइपलाइन) बिजू गोपीनाथ, महाव्यवस्थापक एम. राजन, नाशिक पश्चिम विभागाचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांची याप्रसंगी उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते ड्रोनमध्ये सीड्सबॉल्स टाकून उपक्रमाचा औपचारिक प्रारंभ करण्यात आला. (Bharat Petroleum Corporation Limited (BPCL))

यावेळी जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले, जागतिक तापमानवाढ आणि बदलत्या पर्यावरणीय बदलाच्या काळात 'बीपीसीएल'चा (Bharat Petroleum Corporation Limited (BPCL)) हा उपक्रम कौतुकास्पद आहे. याचे यश पाहून पर्यावरण रक्षण आणि हरित नाशिकसाठी असे प्रयोग जिल्ह्यात इतर ठिकाणीही राबवण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. त्यासाठी जिल्ह्याला मिळणाऱ्या निधीतूनही साहाय्य केले जाईल.

'बीपीसीएल'च्या (Bharat Petroleum Corporation Limited (BPCL)) पुनर्वनीकरण प्रकल्पात पहिल्या टप्प्यात ड्रोनद्वारे दोन लाख 'सीड्सबॉल्स' माळरानावर रुजवले जाणार आहेत. अशा प्रकारचा हा राज्यातील पहिलाच उपक्रम आहे, अशी माहिती कंपनीचे कार्यकारी संचालक बिजू गोपीनाथ यांनी दिली. बीजारोपण झालेल्यापैकी ५० टक्क्यांहून अधिक बीजांचे अंकुरण होण्याचा प्रयत्न राहील. रोपटे उगवल्यानंतर त्याचे संगोपन वनविभाग आणि स्थानिकांच्या मदतीने केले जाणार आहे.

'या' देशी वृक्षांचे बीजारोपण

साधारणत: ज्या झाडांची अधिक निगा राखण्याची गरज नसते आणि जे येथील मातीत रुजून बहरतील अशा आंबा, कडुनिंब, कारंजा, सागवान, देशी जांभूळ, खैर, शिसवी (इंडियन रोजवूड) या देशी प्रजातींचे बीज गायीचे शेण, कोळसा आणि इतर सेंद्रिय घटकांमध्ये मिसळून त्यांचे 'बॉल' करण्यात आले आणि त्याचे रोपण माळरानावर केले. उपक्रमात स्थानिकांना 'सीड्सबॉल्स' उत्पादन, जमिनीचे व्यवस्थापन आणि पर्यावरण जागृती करून आर्थिक संधीची निर्मिती करण्याचेही उद्दिष्ट आहे.

ड्रोन तंत्रज्ञानाच्या मदतीने स्थानिकांना सहभागी करत शाश्वत वातावरण निर्माण करण्यासाठी कंपनीने उपक्रम हाती घेतला आहे. 'इकोसिस्टीम' स्थानिक लोक यांना फायदा व्हावा यासाठी तसेच हिरवेगार आणि निरोगी भविष्य घडवण्यासाठी कटिबद्ध आहोत.
बिजू गोपीनाथ, कार्यकारी संचालक, बीपीसीएल. नाशिक.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT