Shalarth ID Scam Pudhari News Network
नाशिक

Shalarth ID Scam Nashik | शिस्तीचे धडे देणाऱ्या शिक्षकांना बशिस्तीबद्दल पॉलिसी प्रसाद!

Shalarth ID Scam Nashik | शालार्थ घोटाळ्यात चौकशीत सहकार्य करणाऱ्यांना 'सच बोल पट्ट्या'चे फराळ

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : निखिल रोकडे

'छडी लागे छमछम, विद्या येई घमघम!' ही म्हण शाळेच्या वर्गखोऱ्यांमध्ये अनेकदा ऐकायला मिळायची. हातात छडी घेऊन विद्यार्थ्यांना शिस्तीचे धडे देणाऱ्या शिक्षकांपैकी काहीर्वां आता स्वतःच पोलिसांच्या चौकशीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. राज्यभर गाजत असलेल्या १६० कोटी रुपयांहून अधिकच्या बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये संशयितांच्या चौकशीदरम्यान नाशिक गुन्हे शाखेकडून 'कडक पाहुणचार' आणि 'सच बोल पट्ट्या'च्या कथित प्रसादाची चर्चा सध्या शिक्षण क्षेत्रात रंगली आहे.

एका काळी विद्यार्थ्यांना शिस्त आणि अभ्यासाचे धडे देणारे काही शिक्षक आता शालार्थ घोटाळ्याच्या तपासाच्या फेऱ्यात अडकले आहेत. या घोटाळ्याच्या तपासात एक हजारहून अधिक शिक्षक, संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि शिक्षण विभागाशी संबंधित व्यक्ती संशयाच्या भोवऱ्यात असल्याचे सांगितले जाते.

बनावट शालार्थ आयडीच्या माध्यमातून झालेल्या कथित गैरव्यवहाराची पाळेमुळे शोधण्यासाठी नाशिक शहर गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. तपासात सहकार्य न करणे, प्रश्नांना उडवाउडवीची उत्तरे देणे आणि संबंधित माहिती लपवण्याचा प्रयत्न करणे, अशा आरोपांच्या पार्श्वभूमीवर संशयितांची चौकशी आहे.

'सच बोल पट्ट्या' उगारताच काहींच्या डोळ्यातून अश्रूधारा सुरू झाल्या. चौकशीत सहकार्य न करण्याची भूमिका घेणारे संशयित थेट आता पोलिस यंत्रणेसमोर शरणागती पत्करून पोपटासारखे बोलायला लागले. चौकशीसाठी बोलावल्यानंतर काही जण आजारपणाची कारणे पुढे करत असल्याचे, तर काही शिक्षक आणि मुख्याध्यापक चौकशीपासून दूर राहत असल्याचे बोलले जाते.

काही संशयित फरार असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे तपास यंत्रणेला कागदपत्रांची सत्यता, नियुक्त्यांचे तपशील, वेतनाशी संबंधित नोंदी आणि आर्थिक व्यवहारांची साखळी तपासली जात आहे. मात्र, संशयितांना मारहाण किंवा 'पट्ट्याचा प्रसाद' दिला जात असल्याच्या चर्चांना अधिकृत दुजोरा उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे अशा दाव्यांची पुष्टी झालेली वस्तुस्थिती म्हणून मांडता येत नाही. कोणत्याही संशयिताची चौकशी कायदेशीर प्रक्रियेनुसार होणे आवश्यक आहे.

बड्या संस्थांपासून अधिकाऱ्यांपर्यंत तपासाचे जाळे

मोठ्या शिक्षण संस्थांशी संबंधित व्यक्ती, शिक्षण विभागातील अधिकारी आणि कथित मध्यस्थांवरही कारवाई झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष नितीन उपासनी कारागृहात आहेत.

त्यांचा जामीन अर्ज वारंवार फेटाळण्यात आल्याची माहिती आहे. तसेच विद्यमान शिक्षण उपसंचालक आणि याप्रकरणाच्या सुरुवातीला फिर्यादी असलेले भाऊसाहेब चव्हाण यांचाही जामीन अर्ज नुकताच फेटाळण्यात आल्याचे सांगितले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT