Bird Flu Pudhari
नाशिक

Nashik Swine Flu Cases | नाशिककरांना मोठा दिलासा; ऑक्टोबरच्या तीन आठवड्यांत स्वाइन फ्लूच्या रुग्णांत लक्षणीय घट

Nashik Swine Flu Cases | ऑक्टोबरच्या तीन आठवड्यांत आढळले २५ रुग्ण

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात ऑक्टोबर हीटमुळे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने सणासुदीच्या काळात नाशिककरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. गत सप्टेंबर महिन्यात स्वाइन फ्लूचे १८३ रुग्ण आढळले होते. त्या तुलनेत ऑक्टोबरच्या पहिल्या तीन आठवड्यांत केवळ २५ रुग्णांची नोंद झाली आहे.

दरम्यान, पावसाने महिनाभராपासून विश्रांती घेतली असली, तरी डेंग्यूच्या रुग्णसंख्येत घट झालेली नाही. सप्टेंबरमध्ये डेंग्यूचे ८१ रुग्ण आढळले होते. ऑक्टोबरच्या तीन आठवड्यांतच हा आकडा ८२ वर पोहोचल्याने महिनाअखेरीस रुग्णसंख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

डेंग्यूसदृश आजारामुळे दोन संशयित मृत्यूंची नोंद झाली आहे. अंबड लिंक रोड परिसरातील विनोद लखीराम मडैया (दि. १७) या युवकाचा गेल्या आठवड्यात मृत्यू झाला. यापूर्वी सप्टेंबरमध्ये पाथर्डी परिसरातील एका युवतीचाही डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाला होता. या दोन्ही मृत्यूंचे कॉज ऑफ डेथ ऑडिट अद्याप बाकी आहे.

स्वाइन फ्लूच्या रुग्णांत घट

जानेवारी ते जूनदरम्यान स्वाइन फ्लूचे केवळ सात रुग्ण आढळле होते. जुलैमध्ये २१, ऑगस्टमध्ये ११९, तर सप्टेंबरमध्ये १८३ रुग्णांची नोंद झाली.

जुलै आणि ऑगस्टमध्ये पाच, तर सप्टेंबरमध्ये सहा मृत्यू झाल्याने एकूण मृत्यूंची संख्या ११ झाली आहे. ऑक्टोबरमधील रुग्णसंख्येतील घट दिलासादायक असली, तरी डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान कायम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT