स्वच्छ सर्वेक्षणाचे पथक नाशिकमध्ये दाखल Pudhari News Network
नाशिक

Swachhta Survey Team at Nashik | स्वच्छ सर्वेक्षणासाठी केंद्रीय पथक आज नाशकात

Nashik News : तीन दिवस शहर स्वच्छतेचा आढावा घेणार

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमुळे लांबलेल्या स्वच्छ सर्वेक्षणाला अखेर मुहूर्त लाभला आहे. स्वच्छ सर्वेक्षणासाठी केंद्रीय पथक मंगळवारी (दि.१८) नाशिकमध्ये दाखल होत आहे. तीन दिवस हे पथक नाशिकमध्ये फिरून शहर स्वच्छतेचा आढावा घेणार आहे. (Arrival of central inspection team for cleanliness survey 2025)

केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभरात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येते. या अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षणाच्या माध्यमातून देशपातळीवर स्वच्छ शहरांची यादी दरवर्षी प्रसिद्ध केली जात असते. 'स्वच्छ, सुंदर व हरित नाशिक'ची बिरूदावली मिरवणाऱ्या नाशिक शहराचा या सर्वेक्षणातून देशातील पहिल्या दहा स्वच्छ शहरांच्या यादीत समावेश व्हावा यासाठी महापालिकेचे प्रयत्न आहेत. मात्र, गेल्या आठ वर्षांत स्वच्छ शहरांच्या यादीत नाशिकची सातत्याने पिछेहाट होत राहिली आहे. मंगळवारपासून सर्वेक्षणासाठी केंद्राचे हे पथक नाशिकमध्ये दाखल होत आहे. मालेगाव येथील सर्वेक्षण आटोपल्यानंतर हे पथक मंगळवारी सकाळी १० वाजता नाशिकमध्ये येऊन पाहणी करणार आहे.

पथकामार्फत या बाबींचे होणार मूल्यांकन

केंद्रीय पथकामार्फत होणाऱ्या या तपासणीदरम्यान संपूर्ण घनकचरा व्यवस्थापनाच्या मूल्यांकनावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. पथकामार्फत घनकचरा व्यवस्थापनाच्या स्थळांना भेटी दिल्या जातील. घंटागाड्यांद्वारे होणारे केरकचरा संकलन, वाहतूक, खतप्रकल्पावर होणारी प्रक्रिया, कचऱ्यापासून कंपोस्ट खतनिर्मिती आदी प्रक्रियेचे या पथकामार्फत मूल्यांकन केले जाणार आहे.

स्वच्छ सर्वेक्षणासाठी केंद्रीय पथक मंगळवारी नाशिकमध्ये दाखल होत आहे. तीन दिवस शहरातील विविध भागांत या पथकामार्फत भेटी दिल्या जाणार आहेत. स्वच्छ शहरांच्या यादीत नाशिकची कामगिरी उंचावण्यासाठी महापालिकेतर्फे सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.
स्मिता झगडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका, नाशिक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT