Deolali Cantonment Board / देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड Pudhari News Network
नाशिक

Swachh Survekshan | स्वच्छ सर्वेक्षणात देवळाली कॅन्टोन्मेंटची बाजी

देशात दुसऱ्या, तर राज्यात प्रथम; सलग दुसऱ्या वर्षी स्थान कायम

पुढारी वृत्तसेवा

देवळाली कॅम्प (नाशिक) : देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाने 'स्वच्छ देवळाली, सुंदर देवळाली, हरित देवळाली' या घोषणेला साजेसे काम केले आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशात दुसरा, तर राज्यातील कॅन्टोन्मेंटमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. मागीलवर्षी देखील देवळालीने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला होता.

केंद्र शासनाने जाहीर केलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या स्वच्छ सर्वेक्षणमध्ये देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाला गुण 12500 मधून 10255 गुण मिळाल्याने देशात दुसरा, तर राज्यात पहिला येण्याचा बहुमान मिळाल्याचे येथील आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता यांनी सांगितले. दरवर्षी देशभरात स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविण्यात येते. ६२ कॅन्टोन्मेंट बोर्डांपैकी देशात, देवळाली बोर्डाने त्यांच्या श्रेणीत दुसरे स्थान मिळवले आहे. तसेच राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. देवळाली कॅन्टोन्मेंटने २०२४ मध्ये अभूतपूर्व कामगिरी केली आहे.

२०२० मध्ये स्वच्छ भारत अभियानात घसरलेला क्रमांक लक्षात घेऊन बोर्ड प्रशासनाने स्वच्छतेबाबत विशेष मोहीम राबविण्यासाठी काम केली तसेच कामकाजात सुधारणा केली. त्यामुळे सर्वेक्षणात चांगली रँक मिळाली आहे. यासाठी संपूर्ण टीमने संयुक्तिक काम केले. सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीने मंडळाच्या सदस्यांनी यशाचा आलेख उंचावला. घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे, कचरा वेचण्याचे ठिकाण विकसित करणे आणि स्वच्छता व स्वच्छतेबाबत रहिवाशांमध्ये जागृती करणे, यासारख्या विविध पद्धती राबविताना नागरिकांनाही त्यात सामावून घेतले.

सिकंदराबाद कॅन्टोन्मेंट देशात प्रथम

देशभरात मध्य प्रदेशमधील सिकंदराबाद कॅन्टोन्मेंट बोर्डाने कॅन्टोन्मेंट श्रेणीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. देवळाली बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मणी त्रिपाठी, आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता, आरोग्य निरीक्षक मयूर सोदे, शुभम शेंडगे, तांत्रिक सल्लागार शाजेब सय्यद, आरोग्य पर्यवेक्षक शिवाजी सपकाळे, सुरेश थामेत यांच्यासह शिवाय कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन कचरा गोळा करणे, त्याची योग्य ती विल्हेवाट लावणे याकामी शर्थीचे प्रयत्न केले. त्याचे यशस्वी फलित निकालातून दिसून आले आहे.

Nashik Latest News

या यशाचे श्रेय बोर्ड अध्यक्ष, आरोग्य अधीक्षक आणि शहरासाठी समर्पितपणे काम करणार्‍या सर्व स्वच्छता कामगारांना जाते. यापुढेही ही स्थिती अजून सुधारण्यासाठी कठोर परिश्रम करीत देशात प्रथम क्रमांक पटकावण्याचा मानस आहे.
अभिषेक मणी त्रिपाठी, मुख्य कार्यकारी अधिकारी, कॅन्टोन्मेंट, देवळाली.
कामगारांची मेहनत आणि अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन वेळोवेळी लाभल्याने देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड सर्वेक्षणात सलग दुसऱ्या वर्षी केंद्रात दुसरे आणि राज्यात प्रथम आले.
एन. एच. पटेल. शासकीय मक्तेदार
२०२१ पासून स्वच्छता सर्वेक्षणात देवळाली राज्यात प्रथमस्थानी आहे. गेल्या दोन वर्षांपासून देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. ब्रिटिश काळापासून देवळाली हवामान व स्वच्छतेसाठी प्रसिद्ध असून, अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे हे यश मिळाले आहे.
सचिन ठाकरे, नामनिर्देशित

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT