सुरगाणा | सुरगाणा तालुक्यातील मनखेड परिसरातील ठाणकाचीबारी ते मनखेड येथे रस्त्यांचे काम सुरु असून संबंधित ठेकेदाराच्या अनियोजित कारभाराने जायविहीर, कवेली, भाटविहीर, नडगदरी, आंब्याचापाडा या पाच गावांचा वाहनाअभावी संपर्क तुटला असून नुकतीच कवेली येथील एक गरोधर मातेला अचानक पोटात कळ यायला लागल्याने दोन्ही बाजूने रस्ते बंद असल्याने रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था नव्हती. त्यामुळे रस्त्यातच प्रसुती करण्याची वेळ ओढावली.
दोन्ही बाजुचे रस्ते बंद होते. त्यामुळे 1950 मध्ये ज्या पद्धतीने प्रसुती होत त्याप्रमाणे प्रसुती करण्याची वेळ ओढावली. एका लाकडाला एकआधार घेऊन त्याला ब्लॅंकेट बांधून पायी पायी चालत डोली बांधून घेऊन जात असतांना अचानक रस्त्यातच त्या मातेला बाळाला जन्म द्यावा लागला. सुदैवाने दुर्दैवी काही वाईट झालं नाही, अशी परिस्थिती ओढावल्यानंतर संबंधित ठेकेदाराशी संपर्क केला असता त्याने उडवाउडवीचे उत्तर दिल्याचे नागरिकांनी सांगितले.
सदयाच्या परिस्थितीचा विचार केला तर मनखेड परिसरात याच रस्त्याने फिरणे म्हणजे कसरतीचे काम आहे. गेल्या मागील वर्षांपासून हे काम चालू असून अद्यापही रस्त्याच्या कामाला सुरळीत सुरवात झालेली नाही. अर्धवट काम करून आणि ते काम पून्हा थांबवून दुसऱ्या साईटचे काम करतात अशी त्यांच्या कामाची अवस्था असून येणाऱ्या काळात प्रवाशांना त्रास होऊ नये व अर्धवट राहिलेल्या रस्त्यांचे कामे तात्काळ पूर्ण करावी अशी मागणी या भागातील जनतेकडून होत आहे.