आमदार सुहास कांदेंवर गुन्हा दाखल file
नाशिक

Suhas Kande | शिवीगाळ करत धमकावल्या प्रकरणी आमदार सुहास कांदेंवर गुन्हा दाखल

राजकीय हेतूने जाणून बुजून सर्व गोष्टी होत असल्याची कांदे यांची प्रतिक्रिया

पुढारी वृत्तसेवा

नांदगाव : शिवीगाळ करत धमकावल्या प्रकरणी आ. सुहास कांदे यांच्या विरोधात नांदगाव पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, शेखर पगार आणि विनोद शेलार यांनी याबाबत नांदगाव पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री तक्रार दिली होती.

समीर भुजबळ यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी शेखर पगार याना सभेत मोबाईलवर तर शेलार यांना तहसील परिसरात धमकावले असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.

पोलीस उपनिरीक्षक बाहकर हे पुढील तपास करीत असून, आमदार कांदे यांना या बाबत विचारले असता राजकीय हेतूने जाणून बुजून सर्व गोष्टी होत असल्याची प्रतिक्रिया आमदार सुहास कांदे यांनी यावर दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT