Cancer Pudhari
नाशिक

Mahatma Jyotirao Phule | राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून कॅन्सरग्रस्तांना मोठा दिलासा

Mahatma Jyotirao Phule | पीटी - सीटी तपासनची स्वतंत्र व नियमित प्रक्रिया समावेश

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
विस्तारित महात्मा ज्योतिराव फुले जनआरोहण योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेर्तगत कर्करोगाच्या (कॅन्सर) रुग्णांना दिलासा देण्यासाठी उपचारांच्या यादीत महत्त्वपूर्ण सुधारणा केली आहे.

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, कर्करोगावरील अतिरिक्त ६३ उपचारांसाठी 'पॉझिट्रॉन एमission टोमोग्राफी - कम्युनाइटेड टोमोग्राफी पीईटी-सीटी' ही निदान प्रक्रिया समाविष्ट करण्यास मान्यता दिली आहे तसेच निवडक १३ प्रकारच्या कर्करोगासाठी ही तपासणी स्वतंत्र व नियमित प्रक्रिया म्हणून उपलब्ध होणार आहे.

या योजनेअंतर्गत यापूर्वी निश्चित केलेल्या २,३१९ उपचारांच्या समग्र यादीमध्ये कर्करोगाशी संबंधित ५१५ उपचारांचा समावेश आहे. त्यापैकी ४४ उपचारांसाठी पीईटी - सीटी तपासणी अतिरिक्त निदान प्रक्रिया म्हणून उपलब्ध होती. आता आणखी ६३ उपचारांसाठी या तपासणीचा समावेश करणार आहे.

त्यामुळे कर्करोग निदानासाठी आणि उपचारांच्या परिणामांचे मूल्यमापन करण्यासाठी रुग्णांना मदत होणार आहे. शासन निर्णयानुसार, विशिष्ट प्रकारच्या कर्करोगामध्ये रोगाची अवस्था निश्चित करणे, उपचारांना मिळणारा प्रतिसाद तपासणे आणि रोगाची पुनरावृत्ती झाली आहे का, याचे मूल्यमापन करणे यासाठी पीईटी - सीटी तपासणी उपयुक्त ठरते.

त्यामुळे निवडक १३ प्रकारच्या कर्करोगासाठी आवश्यक वैद्यकीय कागदपत्रंची पूर्तता करण्याच्या अटिव्हर ही तपासणी स्वतंत्र किंवा नियमित प्रक्रिया म्हणून समाविष्ट करण्यात आलेली आहे. या निर्णयासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने नियुक्त केलेल्या अभ्यास समितीच्या शिफारसी मान्य केल्या आहेत. तसेच राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने समाविष्ट केलेल्या प्रत्यारोपणानंतर १२ महिने पूर्ण झाल्यानंतरच्या उपचार पॅकेजचाही या योजनेअंतर्गत समावेश करण्यास मान्यता दिली आहे.

पीईटी - सीटी स्कॅन म्हणजे काय?

पीईटी - सीटी स्कॅन ही कर्करोगाचे (कॅन्सर) अचूक निदान आणि तपासणीसाठी वापरली जाणारी अत्याधुनिक इमेजिग चाचणी आहे. कॅन्सरच्या उपचारात लवकर निदान, कॅन्सरचा टप्पा ओळखणे, उपचाराचा परिणाम तपासणे, कॅन्सरचा पुनरुद्भव यासाठी उपयोगी ठरते.

...अशा आहेत आवश्यक पात्रता व अटी

  • योजनेचा लाभार्थी असणे : रुग्णाने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना किंवा आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या लागू पात्रता निकषांची पूर्तता केलेली असावी.

  • निवडक कर्करोग : स्वतंत्र किंवा नियमित पीईटी - सीटी तपासणीचा लाभ शासन निर्णयातील परिशिष्ट - २ मध्ये नमूद केलेल्या निवडक १३ प्रकारच्या कर्करोगासाठी लागू असेल.

  • वैद्यकीय आवश्यकता : रोगाचे टप्पानिर्धारण, उपचारांना मिळणारा प्रतिसाद किंवा रोगाच्या पुनरावृत्तीचे मूल्यमापन करण्यासाठी तपासणी आवश्यक असणे गरजेचे आहे.

  • आवश्यक कागदपत्रे : संबंधित कर्करोग उपचारासाठी शासनाने निर्देशित केलेली वैद्यकीय कागदपत्रे आणि इतर आवश्यक पुरावे सादर करणे बंधनकारक आहे.

  • अंगीकृत रुग्णालय : ही सुविधा देण्यासाठी संबंधित रुग्णालयाने योजनेच्या लागू अटी व निकषांची पूर्तता केलेली असावी.

  • अतिरिक्त निदान प्रक्रिया : अन्य ६३ उपचारांसाठी पीईटी तपासणी संबंधित उपचार पॅकेजसोबत अतिरिक्त निदान प्रक्रिया म्हणून उपलब्ध असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT