नाशिक : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत केंद्र सरकारची 'स्टैंडअप इंडिया' योजना अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नवउद्योजकांसाठी राबविण्यात येते. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नवउद्योजकांनी या योजनेच्या लाभासाठी येत्या सोमवार, दि. 23 डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त देवीदास नांदगावकर यांनी केले आहे.
योजनेच्या अटी व शर्ती तसेच योजनेच्या अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, नासर्डी पुलाजवळ, नाशिक-पुणे रोड यांच्या कार्यालयात संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.