ST Bus Senior Citizen Fare Maharashtra 
नाशिक

ST Bus Senior Citizen Fare Maharashtra-एसटीत ज्येष्ठांना आता दोन रुपये भाडे

सुट्या २ रुपयांसाठी वाहकांना कटकट वाढली, नियमित भाड्यातही वाढ

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : ज्येष्ठ नागरिक योजनेंतर्गत ७५ वर्षापुढील प्रवाशांना सरकारने तिकीट भाड्यात १०० टक्के सवलत दिली आहे. मात्र त्यांच्याकडूनही दोन रुपये भाडे घेतले जात आहेत. त्यामुळे ही योजना मोफत राहिलेली नाही. दरम्यान, सुट्या पैशांमुळे वाहकांची कटकट वाढली आहे.

एसटीच्या प्रत्येक प्रवाशाकडून १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून दोन रुपये स्वच्छता अधिभार अतिरिक्त वसूल करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आलेले आहेत. दररोज शेकडो ज्येष्ठ नागरिक एसटी बसने प्रवास करीत असतात, आधारकार्ड दाखविल्यावर वाहक वयाची जुळवणी केल्यानंतर शून्य किमतीचे तिकीट ज्येष्ठ नागरिकांना देत होते. मात्र आता ज्येष्ठांकडून दोन रुपये आकारून तिकीट दिले जात आहे. अर्थात प्रवास मोफतच आहे. मात्र स्वच्छता अधिभार शासनाने लागून केल्याने ज्येष्ठांनाही तो अधिभार आकारला जात आहे. परंतु अनेक ज्येष्ठ नागरिकांना त्याबाबत माहिती नाही. ते पैसे देण्यास टाळाटाळ करताना दिसतात. त्यातून वाद उद्भवतो, तर अनेक जण देण्यास तयार असतात, मात्र २ रुपयांसाठी ५० किंवा १०० रुपयांची नोट पुढे केली जाते. त्यामुळे वाहकाला उर्वरित पैसे परत देण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. किंवा वेळप्रसंगी सुट्या पैशांवरून ज्येष्ठ नागरिक व वाहकांमध्ये वाद होतात.

विद्यार्थ्यांना सवलत

विद्यार्थ्यांकडून स्वच्छता अधिभारापोटी कोणतेही अतिरिक्त शुल्क वसूल करण्यात येणार नाही. विद्यार्थ्यांबाबत मासिक पास, अहिल्याबाई होळकर विद्यार्थिनी पास, मानवविकास या सवलत पासधारक विद्यार्थ्यांना स्वच्छता अधिभार आकारला जाणार नाही.

१० टक्के भाडेवाढ

अवैध प्रवाशी वाहतुकीकडून प्रवासी एसटीकडे वळत आहे, त्यामुळे एसटीला चांगले दिवस आले आहेत. मात्र ऐन सुटीचा काळात एसटीने प्रवास तिकिटाचा रकमेत १० टक्के भाडेवाढ केल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यातच शिवाई ई-वसमध्ये जवळपास दुप्पट तिकीटदर आहे. तर साध्या बसमध्ये १० टक्के भाडेवाढ केली आहे.

स्वच्छता अधिभार सर्वांना लागू

महिला सन्मान योजना व ज्येष्ठ नागरिक (६५ वर्षावरील व ७५ वर्षापर्यंतचे ज्येष्ठ नागरिक), अमृत ज्येष्ठ नागरिक, अन्य सर्व सवलतधारी प्रवाशांकडून दोन रुपये आकारले जात आहेत. एसटी महामंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार, आता प्रत्येक बस तिकिटावर २ रुपये स्वच्छता अधिभार निधी म्हणून आकारला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT