देवळा; पुढारी वृत्तसेवा : भावडबारी घाटात एसटी बसचा ब्रेक फेल झाला. चालकाने प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या कडेला पडलेल्या दगडांवर उभी केल्याने मोठा अनर्थ टळला. देवळा येथील एक महिला प्रवाशी किरकोळ जखमी झाली. ही घटना आज (दि.१७) सकाळी आठच्या सुमारास घडली. (Nashik ST Bus Accident)
याबाबत अधिक माहिती अशी, आज सकाळी आठच्या सुमारास नवापूर आगाराची शिर्डी - नवापूर बसचा ( एम एच २० / २२३२ ) भावडबारी घाटात उताराला ब्रेक फेल झाला. या बसमध्ये एकूण ४७ प्रवाशी होते. ब्रेक फेल झाल्यानंतर प्रवासामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान, चालकाने प्रसंगावधान राखून घाटात रुंदीकरणाच्या कामासाठी टाकलेल्या दगडांवर बस घातल्याने बस जागेवर उभी राहिली.