Central Railway special trains during Diwali and Chhath festival season
देवळाली कॅम्प (नाशिक) : येत्या पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव हंगामात मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई, पुणे, नागपूर या ठिकाणांवरून विशेष गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
विशेष गाड्या याप्रमाणे...
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–गोरखपूर– मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष (१३२ फेऱ्या)
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – गोरखपूर विशेष सेवा २६ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत ६६ फेऱ्या
गोरखपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) दरम्यान २८ सप्टेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत ६६ फेऱ्या होणार आहेत. या गाड्यांना दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ हे थांबे राहणार आहेत.
पुणे – गोरखपूर – पुणेदरम्यान २७ सप्टेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत १३० फेऱ्या होणार आहेत.
गोरखपूर – पुणे विशेष सेवा २८ सप्टेंबर ते १ डिसेंबरदरम्यान ६५ फेऱ्या राहणार आहेत. या गाड्यांना दौंड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा हे थांबे राहणार आहेत.
नागपूर – पुणे – नागपूर दरम्यान २७ सप्टेंबर ते २९ नोव्हेंबरदरम्यान २० फेऱ्या होणार आहेत.
लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) – दानापूर – लोकमान्य टिळक टर्मिनस दैनिक विशेष ट्रेनच्या १३४ फेऱ्या होणार आहेेत. या गाडीला ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी हे प्रमुख थांबे आहेत.
मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस – नागपूर – लोकमान्य टिळक टर्मिनसदरम्यान साप्ताहिक २० फेऱ्या राहणार आहेत.