Postal Stamps  
नाशिक

Postal Stamps | रामकुंड, कुशावर्तावर विशेष टपाल तिकिटांचे ध्वजारोहण सोहळ्यात अनावरण

Postal Stamps | सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिक, त्र्यंबकेश्वरचा धार्मिक वारसा देशभार पोहोचणार

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या धार्मिक व सांस्कृतिक वारसाला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी भारतीय टपाल विभागाने 'माय स्टॅम्प' उपक्रमांतर्गत रामकुंड आणि कुशावर्त तीर्थ या दोन पवित्र स्थळांवर आधारित विशेष टपाल तिकिटे तयार केली आहेत.

येत्या ३१ ऑक्टोबरला सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्यात त्यांचे अनावरण होणार आहे. या तिकीटांतून सिंहस्थातील वैष्णव आणि शैव परंपरांचे दर्शन घडणार आहे.
नाशिकमधील रामकुंड हे वैष्णव परंपरेशी, तर त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त तीर्थ हे शैव परंपरेशी निगडित महत्त्वाचे तीर्थस्थान आहे.

या दोन्ही स्थळांची निवड करून सिंहस्थाच्या आध्यात्मिक परंपरेचे वैशिष्ट्य टपाल तिकीटांच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आले आहे. रामकुंडाच्या टपाल तिकीटावर रामतीर्थाची ऐतिहासिक वास्तुक रचना, तीर्थाचे पावित्र्य आणि सिंहस्थाशी असलेले अतूट नाते चित्रित करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थावर आधारित तिकीटातून शैव परंपरेचा वारसा अधोरेखित करण्यात आला आहे. कुशावर्त तीर्थाची वैशिष्ट्यपूर्ण वास्तुक रचना आणि पार्श्वभूमीवरील ब्रह्मगिरी पर्वतारांग यांचे दर्शन या तिकीटातून घडणार आहे.

"सिंहस्थ महाकुंभमेळा हा नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या समृद्ध आध्यात्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसाचे प्रतीक आहे. टपाल तिकीते ही केवळ पत्रव्यवहाराचे माध्यम नसून, देशाचा सांस्कृतिक वारसा आणि ऐतिहासिक ठेवा जतन करणारे प्रभावी माध्यम आहे. या उपक्रमामुळे सिंहस्थ महाकुंभमेळ्याची परंपरा आणि तीर्थस्थळांचे महत्त्व भावी पिढ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल."
— शेखर सिंह, आयुक्त, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT