प्रतिकात्‍मक छायाचित्र.  AI-generated image
नाशिक

Solapur Religious Rituals | "वाढत्या महागाईचा फटका आता देवकार्यालाही! श्रावण अन् गणेशोत्सवापासून धार्मिक विधींच्या दक्षिणेत 30 टक्के वाढ"

Solapur Religious Rituals | वाढत्या महागाईचा फटका आता थेट देवकार्यासह धार्मिक विधींना बसला आहे. पेट्रोल आणि जीवनावश्यक वस्तू महागल्याने पुरोहितांनीही दक्षिणेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : श्याम जोशी

वाढत्या महागाईचा फटका आता थेट देवकार्यासह धार्मिक विधींना बसला आहे. पेट्रोल आणि जीवनावश्यक वस्तू महागल्याने पुरोहितांनीही दक्षिणेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ साधारणतः ३० टक्के असेल. तोंडावर आलेल्या श्रावण मासातील धार्मिक विधींसह गणेशोत्सवापासून ही वाढ प्रामुख्याने लागू होईल.

संस्कृतीचे पालन करणारे धार्मिक विधींसाठी पुरोहितांना निमंत्रण देतात. यामध्ये ब्राह्मण, जंगम (स्वामी), पंतुलु, गोसावी, गुरव, भोपी ; याशिवाय रा. स्व. संघाच्या पुरोहित प्रशिक्षण वर्गात तयार झालेले पुरोहित पूजापाठाचे काम करतात. अनेकांच्या उपजीविकेचे ते साधन आहे.

मात्र, वाढत्या महागाईमुळे पुरोहितांनी आता दक्षिणेत वाढ करण्याचा निर्णय घेतला. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे भटजींचा प्रवास खर्च वाढला. त्यातच पूजा साहित्याच्या किमतीतही भरमसाट वाढ झाली आहे.

दहा रुपयांचा उदबत्तीचा पुडा आता ५० रुपयांना मिळतो. नेमकी हीच स्थिती धार्मिक विधींसाठी लागणाऱ्या तूप, तेल, कापूर, धूप, समिधा, फुले आणि सुका मेवा याबाबत झाली आहे. यामुळे पुरोहितांना चरितार्थ चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळे दक्षिणा आणि विधींच्या दरात वाढ करणे अपरिहार्य झाल्याचे पुरोहितांनी दै. 'पुढारी'स सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT