Sinnar Rain Storm Damage 
नाशिक

Sinnar Rain Storm Damage | सिन्नरच्या पूर्व भागाला वादळी पावसाने दिलासा

Sinnar Rain Storm Damage | तालुक्याच्या पूर्व भागात शनिवारी (दि. ६) सायंकाळी ७ च्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने उकाड्यामुळे त्रस्त त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा दिला.

पुढारी वृत्तसेवा

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा

तालुक्याच्या पूर्व भागात शनिवारी (दि. ६) सायंकाळी ७ च्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने उकाड्यामुळे त्रस्त त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा दिला. मात्र, या वादळी वाऱ्यामुळे शहा फीडरवरील ३३ केव्ही वीजवाहिनीचे दोन खांब कोसळल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला.

देवपूर, धारणगाव, सोमठाणे, पंचाळे, फरदापूर, शहा आदी गावांसह पूर्व भागातील अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. पावसापूर्वी अचानक वेगाने वाहू लागलेल्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी पशुधनासाठी साठवून ठेवलेला चारा, भुसा व शेती साहित्य उडून गेले.

काही भागांत झाडांच्या फांद्या तुटल्या, तर काही वृक्ष उन्मळून पडल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचीही चांगलीच धावपळ उडाली. शेतात तसेच घराबाहेर प्लास्टिकच्या आच्छादनाखाली साठवून ठेवलेला कांदा वादळी वाऱ्यामुळे उघडा पडण्याची वेळ आली.

अनेक ठिकाणी प्लास्टिकचे कागद उडून गेल्याने शेतकऱ्यांनी तत्काळ धावपळ करत आच्छादने पुन्हा व्यवस्थित केली. याचदरम्यान, वादळी वाऱ्यामुळे शहा फीडरवरून येणाऱ्या ३३ केव्ही वीजवाहिनीचे दोन विद्युत खांब कोसळल्यामुळे पूर्व भागातील वीजपुरवठा बंद झाला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यासाठी दुरुस्तीकाम सुरू केले आहे.

वीजपुरवठा पूर्ववत होण्यास विलंब

शहा फीडरवरील ३३ केव्ही वीजवाहिनीचे दोन खांब वादळी वाऱ्यामुळे कोसळल्यामुळे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. नुकसान मोठे असल्यामुळे वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी काही कालावधी लागू शकतो. नागरिकांनी संयम बाळगून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT