बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले (Pudhari Photo)
नाशिक

Sinnar Leopard Rescue | सिन्नरच्या कहांडळवाडीत दहशत माजवणारा बिबट अखेर जेरबंद; शेतकऱ्यांना दिलासा

Sinnar Leopard Rescue | वनविभागाच्या तत्परतेमुळे शेतकरी व ग्रामस्थांना दिलासा

पुढारी वृत्तसेवा

सिन्नर: तालुक्याच्या पूर्व भागातील कहांडळवाडी येथे भाऊसाहेब गुंजाळ व महेंद्र कहांडळ यांच्या शेत गट नंबर २१४/१४३/१/१ येथे तसेच ब्राह्मणवाडे परिसरात गेल्या काही दिवसांपासून दहशत माजवणारा बिबट अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आला आहे.

ब्राह्मणवाडे परिसरामध्ये धुमाकूळ घातलेल्या बिबट्याला शुक्रवारी (दि.२) बापू पंढरीनाथ गिते यांच्या सामाईक मालकीच्या गट नंबर ५४ मध्ये वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात यशस्वीरीत्या रेस्क्यू करण्यात आले. विवट्या पिंजऱ्यात अडकल्याची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी वर्ग व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

सदर कारवाई उपवनसंरक्षक सिद्धेश्वर सावर्डेकर, सहाय्यक वनसंरक्षक कल्पना वाघोरे तसेच सिन्नर वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. रेस्क्यू मोहिमेत वनपाल तानाजी भुजबळ, वनरक्षक गोविंद पंढरे, वनमजूर रामनाथ साहणे व पोलीस पाटील कमलाकर रामराजे यांनी मेहनत घेतली. बिबटे मोहदरी वनोद्यानात जेरबंद करण्यात आलेल्या विवट्याला घटनास्थळावरून सुरक्षितरित्या सिन्नर येथील मोहदरी वन उद्यानात हलवण्यात आले आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT