onion file photo
नाशिक

Sinnar Red Onion Rate Rs 4300- सिन्नरमध्ये लाल कांद्याला ४,३०० रुपयांचा भाव

बाजार समितीत आवक वाढली; उन्हाळ कांदा क्विंटलला ४,१५० रुपये

पुढारी वृत्तसेवा

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा

कृषी उत्पन्न बाजार समिती, सिन्नरच्या मुख्य बाजार आवारात सोमवारी (दि. २३) कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली. लाल कांद्याची आवक दिवसेंदिवस वाढत असून, लिलावात लाल कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक ४ हजार ३०० रुपयांचा भाव मिळाला. सिन्नर येथील शेतकरी गणेश लोंढे यांच्या कांद्याला हा उच्चांकी दर मिळाला. लाल कांद्याचा सरासरी भाव प्रतिक्विंटल ४ हजार १०० रुपये राहिला.

उन्हाळ कांद्याची आवक एकूण आवकेच्या सुमारे २५ टक्क्यांच्या दरम्यान होती. उन्हाळ कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक ४ हजार १५० रुपये भाव मिळाला. शेतकरी विठ्ठल लोणारे यांच्या कांद्याला हा दर मिळाला, तर उन्हाळ कांद्याचा सरासरी भाव ३ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल राहिला.

यावेळी बाळासाहेब चकोर, दिलीप खिवंसरा, बाबुशेठ लड्डा, सतीश चकोर, सुनील चकोर, जय पन्हाळे, पप्पू गोळेसर, सुजित भाबड, विनोद जाधव, तुषार कलंत्री, मंगेश कर्पे, नागेश लहामगे, पंकज नाईक आदी व्यापारी उपस्थित होते.

लिलावानंतर बाजार समितीच्या कार्यालयातून त्वरित रोख पेमेंट मिळत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. बाजार समितीतून शेतकऱ्यांना त्वरित रोख पेमेंटची सुविधा कृषि उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांनी कांदा व धान्य अन् भुसार शेतमालाची बांधावर परस्पर विक्री न करता बाजार समितीच्या आवारातच विक्री करावी. बाजार समितीतून त्वरित पेमेंटची सुविधा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी निःसंकोचपणे आपला शेतमाल विक्रीसाठी आणावा, असे आवाहन सभापती शरदराव थोरात, उपसभापती सिंधुताई कोकाटे व संचालक मंडळाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT