Simhastha Kumbh Mela Nashik Pudhari News Network
नाशिक

Simhastha Kumbh Mela Nashik | कुंभातील अमृतस्नानाच्या तारखा जाहीर

नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याबाबतची मोठी अपडेट! ध्वजारोहण, शाही स्नान कधी सुरू होणार? बघा तारखा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क | सिंहस्थ कुंभमेळा 22 महिन्यांचा राहणार असून यामध्ये 3 मुख्य शाही स्नान आणि 42 पर्व शाही स्नानांचा समावेश असणार आहेत. अमृतस्नान जुलै 2026 ते सप्टेंबर 2028 कालावधीत पार पडतील.

सिंहस्थ कुंभमेळा 2026 च्या तयारीला सुरुवात झाली असून 31 ऑक्टोबर 2026 रोजी कुंभमेळ्याचे ध्वजारोहण होणार आहे. हा भव्य धार्मिक सोहळा तब्बल 18 महिन्याऐवजी 22 महिन्यांचा राहणार आहे. 31 ऑक्टोबर ते जुलै दरम्यान नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे संपन्न होणार आहे. कुंभमेळ्याच्या शाही स्नान आणि पर्व स्नानाच्या तारखांची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित रविवार (दि.1) रोजी करण्यात आली. मुख्यमंत्री यांच्या समवेत साधू महंत उपस्थित होते.

नाशिकच्या पुण्यनगरीत भरणारा हा भव्य कुंभमेळा अधिक दीर्घकालीन आणि नियोजित स्वरूपात पार पडणार आहे. 31 ऑक्टोबर 2026 पासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार आहे. 24 जुलै 2028 रोजी कुंभमेळाचा शेवटचा दिवस असणार आहे. या कुंभमेळ्यात 42 पर्वस्नान राहणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 13 आखाड्याचे महंत यांच्या उपस्थितीत रविवार (दि.1) रोजी कुंभमेळाच्या नियोजन संदर्भात महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत कुंभमेळाच्या नाशिक आणि त्रंबकेश्वरच्या अमृत स्नानाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

कुंभमेळ्याच्या संभाव्य तारखा अशा...

  • 31 ऑक्टोबर 2026 रोजी कुंभमेळाचे रामकुंडावर ध्वजारोहण करण्यात आल्यानंतर कुंभमेळा पर्वाला प्रारंभ

  • 24 जुलै 2028 पर्यंत कुंभमेळा सुरू राहील.

  • या कालावधीत एकूण 42 पर्व स्नान असणार आहेत.

  • 24 जुलै 2027 रोजी आषाढ कृष्ण पंचमीच्या दिवशी आखाडाचे ध्वजारोहण होणार आहे.

  • 29 जुलै 2027 रोजी एकादशीच्या दिवशी नगर प्रदक्षिणा होईल.

अमृतस्नानाच्या तारखा अशा

  • 2 ऑगस्ट 2027 सोमवती अमावस्याच्या दिवशी पहिले अमृत स्नान होणार आहे.

  • 31 ऑगस्ट 2027 श्रावण वद्य अमावस्या ला महाकुंभस्नान होणार आहे.

  • 11 सप्टेंबर 2027 ला भाद्रपद शुद्ध एकादशीच्या अमृत स्नान होणार आहे.

  • मुख्य पर्वकाळ असणाऱ्या 31 ऑगस्ट2027 च्या दिवशी सूर्य चंद्र गुरू सिंह राशीत आहेत, त्यामुळे या दिवशी महाकुंभ स्नान केले जाणार आहे.

  • यंदाचा कुंभमेळा त्रिखंडी कुंभमेळा आहे, यात गुरू हा वक्री होऊन सिंह राशीतून कर्क आणि कन्या राशीत प्रवेश करतो.

  • यंदाचा कुंभमेळा वक्री आहे, म्हणजेच गुरूचे भ्रमण इतर राशीमध्ये होणार आहे. कोणत्या दिवशी गुरू कोणत्या राशीत प्रवेश करणार याची माहिती.

  • 31 ऑक्टोबर 2026 गुरू सिंह राशीत प्रवेश

  • 24 जानेवारी 2027 वक्री होऊन गुरू कर्क राशीत प्रवेश

  • 25 जून 2027 गुरू सिंह राशीत प्रवेश

  • 26 नोव्हेंबर 2027 गुरू कन्या राशीत प्रवेश

  • 28 फेब्रुवारी 2028 गुरू सिंह राशीत प्रवेश

  • 24 जुलै 2028 गुरू कन्या राशीत प्रवेश करत आहे.

कुंभमेळाचे ध्वजारोहण 31 ऑक्टोबर 2026 ला असल्याने सिंहस्थ कुंभमेळाच्या दुसऱ्या खंडात कुंभमेळ्याच्या शाही पर्वणी सुरु होऊन 24 जुलै 2028 रोजी कुंभमेळा पर्वाचा शेवटचा दिवस राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT