Silver Price in 2025  Pudhari News Network
नाशिक

Silver Price news | चांदीची बुलेट ट्रेन सुसाट; एका दिवसात २२ हजारांची उसळी

ग्राहकांच्या खिशाला पुन्हा कात्री

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव सराफा बाजारात शुक्रवारी (दि. २३) दरवाढीचा जणू स्फोटच झाला. अवघ्या एका दिवसात चांदीने तब्बल २२ हजार रुपयांची ऐतिहासिक झेप घेतली असून, सोन्यानेही तोऱ्यात ४,३०० रुपयांची आघाडी घेतली.

गुरुवारी (दि. २२) शांत असलेला बाजार शुक्रवारी (दि. २३) सकाळी उघडताच दरांचे आकडे पाहून ग्राहकांसह व्यापाऱ्यांचेही डोळे विस्फारले आहेत. नेमका बदल काय ? जळगाव सराफा बाजारात गुरुवारी २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ५१ हजार ५०० रुपये होता, जो शुक्रवारी (दि. २३) थेट १ लाख ५५ हजार ८०० रुपयांवर पोहोचला. दुसरीकडे, चांदीने तर सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. ३ लाख ८ हजार रुपयांवर असलेली चांदी एका दिवसात ३ लाख ३० हजारांवर पोहोचली.

ऐन लग्नसराईच्या तोंडावर विदेशी संस्थांच्या शेअर विक्रीने डॉलरची मागणी वाढल्याने रुपया शुक्रवारी १२ रुपयांच्या घरात गेला आहे. बीएसई स्मॉलकॅप आणि मिड कॅप निर्देशांकात अनुक्रने १.६ आणि २.२ टक्क्यांनी घसरण झाली. अदानी पोर्टस्, इटर्नल, इंडिगो आणि अॅक्सिस बँकेच्या शेअर भावात मोठी पसरण झाल्याने सेन्सेक्सचे सर्वाधिक नुकसान शाले, टेक महिंद्रा, इन्फोसिस, एचयूएल, टीपीएस आणि आयसीआयसीआय बँकेतील गुंल्लमुन्वीर वाद झाल्याने सेन्सेक्सच्या घसरणीला लगाम बलला, निफ्टी रिअल्टी निर्देशांक ३.१४ टक्क्यांनी गडगडला. निफ्टी पीएसयू बैंक निर्देशांकात २.२७ टक्क्यांनी घसरण झाली. निफ्टी मिड कॅप आणि स्मीन कंप निर्देशांक अनुक्रमे १.८ आणि १.९५ टक्क्याने खाली आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT