नाशिक : कंपनी सेक्रेटरीज (सीएस) या राष्ट्रीय स्तरावरील आंतिम परीक्षेत नाशिकच्या शुभम चोरडिया याने देशात तिसरा कमांक मिळविला आहे. शुभम हा येथील निर्मला कॉन्व्हेंट स्कूलचा विद्यार्थी असून, त्याचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईला झाले आहे. (Shubham Chordia secured third rank in the country)
कंपनी सेक्रेटरी अर्थात सीएस एक्झिक्युटिव्ह व प्रोफेशनल म्हणजेच इंटरमिजिएट व फायनल जून २०२४ मध्ये झालेल्या परीक्षांचे निकाल रविवारी (दि.२५) जाहीर झाला. यामध्ये शुभम चोरडिया याने देशात तिसरा क्रमांक मिळवला. दरम्यान, शुभमने डिसेंबर २०२० मध्ये सीए फाउंडेशन या परीक्षेतही राष्ट्रीय क्रमवारीत १९ वा क्रमांक पटकाविला होता.