नाशिक 'श्री राम रबडीवाला' या आस्थापनेत अस्वच्छ वातावरणात अशा प्रकारे रबडी तयार केली जात होती, तर दुसन्या छायाचित्रात सीताफळाच्या गरात आढळलेल्या अळ्या. 
नाशिक

Nashik| सीताफळ गरात अळ्या; 'श्री राम रबडीवाला'चे प्रमाणपत्र निलंबित

Shri Ram Rabdiwala license suspended over worms in custard apple-सिडकोतील आस्थापनेवर अन्न प्रशासनाची कारवाई : स्वच्छतेच्या निकषांचे उल्लंघन

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सिडकोतील पाटीलनगर परिसरातील 'श्री राम रबडीवाला' या आस्थापनेत खड़ी तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सीताफळाच्या गरामध्ये (पल्प) अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) या आस्थापनेची तपासणी केल्यानंतर स्वच्छता व अन्नसुरक्षेच्या निकषांचे उल्लंघन झाल्याचे आढळले. जनआरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाने आस्थापनेचे नोंदणी प्रमाणपत्र तत्काळ निलंबित केले आहे.

राज्यातील नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ व दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून 'सेफ फूड, सेफ महाराष्ट्र' मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत गुरुवारी (दि. १५) शहरातील विविध आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यादरम्यान सिडकोतील, पाटीलनगर येथील राजीव गांधी मार्केट सिडकोतील 'श्री राम रबड़ीवाला' या रखती तयार करून विक्री करणाऱ्या आस्थापनेची अन्न सुरक्षा अधिकारी वैभव गर्दै आणि संकेत येलमामे यांनी तपासणी केली.

या तपासणीदरम्यान रबड़ी तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सीताफळाच्या गरामध्ये अळ्या आढळून आल्या. तसेच आस्थापनेतील स्वच्छता आणि आरोग्यविषयक निकषांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले. अन्नसुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या तरतुदींचे, तसेच परिशिष्ट वारमधील स्वच्छताविषयक निकषांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्याने प्रशासनाने तातडीने कारवाई केली. नागरिकांच्या आरोग्याला निर्माण होणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन आस्थापनेचे नोंदणी प्रमाणपत्र निलंबित करण्यात आले.

'नियमांचे काटेकोर पालन बंधनकारक'

अन्नपदार्थ तयार करणे, त्यांची साठवणूक, हाताळणी आणि विक्री करताना स्वच्छता व सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांना कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नाशिक विभागात सुरू असलेली विशेष तपासणी मोहीम यापुढेही अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहणार आहे. नागरिकांनी अन्नपदार्थांचा दर्जा, स्वच्छता किंवा सुरक्षिततेबाबत कोणतीही शंका असल्यास अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT