अज्ञाताने वृध्दाचे डोके फोडले pudhari file photo
नाशिक

धक्कादायक! भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; नागबलीसाठी आलेल्या वृद्धाचे डोके फोडले

पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर : येथे पितृपक्षानिमित्ताने नारायण नागबली श्राद्ध विधीसाठी भाविकांची गर्दी होत आहे. मात्र, या भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचा प्रकार साेमवारी (दि. २३) घडला. एक कर्णबधीर वृद्ध भाविक सकाळी कुशावर्तावर स्नान करून नागबली विधीसाठी जात असताना अज्ञात इसमाने वीट फेकून मारल्याने ते गंभीर जखमी झाले. धर्मा महादु कुणगर (64) जखमी वृद्ध भाविकाचे नाव आहे.

याबाबत नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, साेमवारी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दक्षिण बाजूस असलेल्या गायत्री मंदिराच्या बाजूने नागबली विधीसाठी जाताना कुणगर यांचे पोट बिघडले. म्हणून ते शेजारच्या नदीपात्रात उतरले. त्यावेळी तेथे असलेल्या काळ्या गणवेशातील वॉचमन सारख्या व्यक्तीने वीट फेकून मारली. ही वीट कुणगर यांच्या डोक्यात लागल्याने त्यांचे डोके फुटले. डोक्यात वीट लागल्याने कुणगर जागेवर कोसळताच वीट फेकून मारणाऱ्या व्यक्तीने पलायन केले. जखमी कुणगर यांना नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. शहरात याबाबत माहिती मिळाल्यानंतर तीव्र संताप व्यक्त करण्यात येऊन काळ्या गणवेशातील वीट फेकून मारणारी व्यक्ती कोण? याबाबत पोलिसांनी मंदिराचे सीसीटीव्ही फुटेज पाहून शोध घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT