love u zindagi file photo
नाशिक

धक्कादायक वास्तव! देशात दर तासाला एकजण संपवतोय जीवनप्रवास

पुढारी वृत्तसेवा
नाशिक : निल कुलकर्णी

भारतात प्रत्येक तासाला एक व्यक्ती जीवनप्रवास थांबविण्याचा पर्याय निवडून जीवनयात्रा संपवतोय, असे धक्कादायक वास्तव नॅशनल क्राइम रिपोर्ट ब्युरो (एनसीआरबी)च्या अहवालातून समोर आले आहे. विशेष म्हणजे वर्षागणिक जीवनप्रवास थांबविण्याऱ्यांचे प्रमाण ८ ते १० टक्क्यांनी वाढत असल्याचेही निदर्शनास आले आहे.

'जीवनप्रवास थांबविण्याबद्दल लोकांच्या मनात असलेले दृष्टिकोन बदलणे' ही यंदाच्या जागतिक जीवनप्रवास थांबविणे प्रतिबंध दिनाची (१० सप्टेंबर) संकल्पना आहे.

एनसीआरबी (नॅशनल क्राइम रिपोर्ट ब्यूरो) च्या डिसेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार भारतात दर तासाला एक व्यक्ती जीवनप्रवास थांबविण्याचा प्रयत्न करत आहे. धक्कादायक बाब म्हणजे सधन वर्गातील तरुण मुले, प्रेमभंग, परीक्षेतील अपयश, पालक रागावले म्हणून, आवडती गाडी, मोबाइल घेऊन दिला नाही अशा अत्यंत क्षुल्लक कारणांमुळे मृत्यूला कवटाळतात. महाराष्ट्रात २०२३ या वर्षात सर्वाधिक चार हजार २४८ शेतकरी आणि शेतमजुरांच्या जीवनप्रवास थांबविला आहे. देशात शेतीशी संबंधित जीवनप्रवास थांबविल्यांपैकी ३८ टक्के मृत्यू हे राज्यातील आहेत.

जीवनप्रवास थांबविणारी व्यक्ती एका दिवसात मृत्यूला कवटाळत नाही. अशा व्यक्तींच्या मनात काही काळ प्रक्रिया, वैषम्य असते जी अंतिमत: जीवनप्रवास थांबविण्यातून व्यक्त होते. अशा वेळी संबंधितांनी मानसोपचार तज्ज्ञांची मदत आणि जवळच्या व्यक्तींशी संवाद साधून नि:संकोचपणे बोलणे, हे जीवनप्रवास थांबविण्यापासून परावृत्त करण्यासाठी मार्ग आहेत, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली.

जीवनप्रवास थांबविणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामागील कारण असा प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती लपवतात. रुग्णही मनमोकळेपणे आपल्या समस्या सोडवण्यापेक्षा त्या लपवतात. त्यामुळे समस्या सुटण्याऐवजी वाढतात. असा रुग्ण जीवनप्रवास थांबविण्यास प्रवृत्त होण्याची जोखीम वाढते. उपचार आणि मनमोकळे बोलून समस्या सुटतात. जीवनप्रवास थांबविण्याचे विचार आल्यास व्यक्तीने तत्काळ मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी. सरकारनेदेखील जीवनप्रवास थांबविण्यासाठी रूपरेषा, कार्यक्रम आखावेत.
डॉ. महेश भिरूड, मानसोपचार तज्ज्ञ, नाशिक.
स्वीकार्हार्यता, सहिष्णुताही हल्ली लोप पावली आहे. सिनेमा, मालिका यांमुळे 'रील' लाइफ हेच 'रिअल' लाइफ असावे असे अनेकांना वाटते. व्यक्ती वास्तवापासून दूर जाते. मनाविरुद्ध गोष्ट घडल्यास नैराश्य येते. जीवनप्रवास थांबविण्याचा विचार करणारी व्यक्ती विवेक, सारासार विचारांपासून दूर गेलेली असते. ज्या क्षणी असा विचार आला, 'तो' क्षण पुढे ढकलण्यासाठी त्याच वेळी तत्काळ जवळच्या व्यक्तीशी बोलावे. तो क्षण जिंकता आला, तर नकारात्मकतेवर जय मिळवता येतो. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपचार घेणेही गरजेचेच आहे.
डॉ. अर्पणा चव्हाण, मानसशास्त्रज्ञ, पुणे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT