नाशिक : कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळापासून संरक्षण प्रतिबंध, मनाई व निवारण अधिनियमची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ज्या कार्यालयांत १० किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी असतील अशा सर्व खासगी आस्थापनांनी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करावी. शासनाच्या निर्देशानुसार या समितीची नोंदणी सी बॉक्स पोर्टलवर करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाणे यांनी दिली.
आस्थापनांनी अंतर्गत समिती स्थापन केली नसल्यास तत्काळ समिती स्थापन करत क्यूआर कोडवर माहिती भरावी. अन्यथा ५० हजारांची दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही बाल विकास अधिकारी दुसाणे यांनी सांगितले. अंतर्गत समितीच्या 'She-Box' (Sexual Harassment electronic Box) पोर्टलवर नोंदणीसाठी क्यूआर कोड स्कॅन करावा. त्यानंतर लॉगइन करत हे बॉक्स लिंक उघडावी. होम पेजवर प्रायव्हेट हेड ऑफीसवर क्लिक करावे. रजिस्टर, प्रोसिड करून फॉर्म भरत सबमिट करावा.