Shashikant Shinde 
नाशिक

Nashik Politics |'गटबाजी खपवून घेणार नाही'; शशिकांत शिंदेंचा नाशिकमधील कार्यकर्त्यांना सज्जड दम

Nashik Politics | शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांकडून तक्रारींचा पाऊस

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

काळात पक्षाचे नेते शरद पवार यांनी पक्ष वाढविला, नेते वाढविले. मात्र, हेच नेते पवारांना सोडून गेले. मात्र, आता आगामी पक्षसंघटना बांधणीवर भर देऊन संघटनेची मजबूत बांधणी केली जाईल. पक्षासाठी अहोरात्र करणाऱ्या काम कार्यकर्त्यांची दखल घेऊन त्यांचे मूल्यमापन घेऊन त्यांना जबाबदारी देण्यात येईल.

पक्षांतर्गत गटबाजी करू नका, यापुढे गटबाजी खपवून घेतली जाणार नाही असा सज्जड दम राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी यावेळी दिला. मे महिन्याअखेर संघटना नव्याने उभी राहिल, त्यासाठी मरगळ झटकून टाका असेही त्यांनी सांगितले. बैठकीत पदाधिकाऱ्यांनी वाढत्या गटबाजीवर तक्रारींचा पाऊस पाडला.

राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीत पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आणि कार्यकत्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार गट) आढावा बैठक सोमवारी (दि.४) प्रदेशाध्यक्ष शिंदे यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी प्रभारी सुनील भुसारा, खा. भास्कर भगरे, प्रदेश उपाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, गोकुळ पिंगळे, लक्ष्मण मंडाले, माजी आमदार संजय चव्हाण, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील, माणिकराव शिंदे, अनिता दामले आदी उपस्थितीत होते.

सुरुवातीस, प्रदेशाध्यक्ष शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकूण घेतले. यात पदाधिका-यांनी पक्षातंर्गत गटबाजीवर तक्रारी केल्या. पक्षात मोठे नेते, नाही मात्र मोठी गटबाजी आहे ही गटबाजी थांबविली पाहिजे. पदाधिका यांकडून कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नाही. महापालिका, नगरपालिका निवडणुकीत पक्षाची उमेदवार घेण्यास कोणीही तयार नव्हते.

स्थानिकांना डावलून, नेत्यांनी परस्पर जागावाटप केले यात पक्षाचे सक्षम उमेदवार असून देता आले नाही. निवडणुकीत उमेदवार उतविल्यानंतर, पक्षाने ताकद दिली नाही, कोणीही विचारायला आले नसल्याची खंत यावेळी कार्यकर्त्यांनी बोलून दाखविली. तक्रारींवर बोलताना प्रदेशाध्यक्ष शिंदे म्हणाले की, झालेल्या निवडणुकीत उमेदवारांना मदत होऊ शकली नाही ही वस्तुस्थिती आहे.

निवडणूक काळात ज्या कार्यकर्त्यांनी संघर्ष केला, त्यांची दखल घेतली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. कार्यकर्त्यांना उघड्यावर सोडू नका, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही थेट मंत्रालयातून ताकद देऊ, असा शब्द देत, तक्रारींच्या निवारणासाठी विशेष हेल्पलाईन आणि फायर फाइट टीम तयार करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

लवकरच नवीन शहराध्यक्ष बैठकीला

शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिलेले गजानन शेलार हे गैरहजर होते. त्यामुळे संघटनात्मक बदल करून पक्षाला लवकरच नवीन शहराध्यक्ष दिला जाणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष शिंदे यांनी बैठकीत सांगितले. तसेच पक्षासाठी नवीन कार्यालय देखील शोधले जाईल असेही त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT