Shard pawar Market yard Nashik
शरदचंद्र पवार कृषि उत्पन्न बाजार समिती pudhari news network
नाशिक

Shard pawar Market yard Nashik| शरदचंद्र बाजार समितीत साफसफाईअभावी दुर्गंधीचा 'चंद्रोदय'

पुढारी वृत्तसेवा
मखमलाबाद : नेमीनाथ जाधव

नाशिक-पेठ रोड रस्त्यावरील आरटीओ कार्यालयासमोर असलेल्या शरदचंद्र पवार बाजार समितीच्या (Shard pawar Market yard Nashik) आवारात रस्त्याच्या कडेला घाणीचे साम्राज्य पसरले असून, ठिकठिकाणी कचरा तसेच खराब झालेले बटाटे, कांदे हे रस्त्याच्या कडेला टाकल्याने सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

समितीच्या आवारात ठिकठिकाणी कचरा असून, आवारातील शौचालयासमोर तसेच मोकळ्या पटांगणावर गाजरगवत मोठ्या प्रमाणात वाढल्याने डेंग्यू तसेच मलेरियाच्या डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

शरदचंद्र पवार कृषि उत्पन्न बाजार समिती

रस्त्याच्या कडेला खराब झालेले फळे टाकून दिल्यामुळे रस्त्याने जाताना-येताना दुर्गंधीचा त्रास शेतकऱ्यांना तसेच कामगारांना सहन करावा लागतो. फळाच्या व्यापारी गाळ्यामध्ये कामगारांना नाकाला रुमाल बांधून मालाची पॅकिंग करावी लागते. बाजार समितीच्या (Shard pawar Market yard, Nashik) प्रवेशद्वारानजीक असलेल्या टोमॅटोच्या बाजारात ठिकठिकाणी सडलेल्या टोमॅटोचे ढिगारे असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तसेच टोमॅटोच्या ढिगांमध्ये ठिकठिकाणी खड्डे तसेच पावसाचे पाणी खड्ड्यात साचल्याने वाहनचालकांना तसेच शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. फळबाजार विभागातसुद्धा घाणीचे साम्राज्य वाढले असून, ठिकठिकाणी खड्डे व खड्ड्यात पाणी साचल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

शरदचंद्र पवार कृषि उत्पन्न बाजार समिती

आवारात काही ठिकाणी पथदीप बंद असल्याने छोट्या-मोठ्या चोरीच्या घटना सतत घडत असतात. रात्रीच्या वेळी पथदीप सुरू करणे महत्त्वाचे असून, शेतकऱ्यांकडून याबाबत मागणी होत आहे. बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ पोलिस चौकी बांधण्यात आलेली असून, ती सध्या बंद अवस्थेत आहे. पूर्वी पोलिस चौकीत पोलिस कार्यरत होते. परंतु सध्या या ठिकाणी पोलिस चौकी ही धूळ खात पडली असून, भग्नावस्थेत दिसून येत आहे. शेतकरी तसेच व्यापाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सदरची पोलिस चौकी बांधण्यात आली होती. (Shard pawar Market yard, Nashik)

शरदचंद्र पवार कृषि उत्पन्न बाजार समिती
बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या मोबाइल चोरीचे प्रमाण वाढले आहे. येथील पोलिस चौकी पूर्ववत सुरू करण्यात यावी. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी पोलिस चौकी बांधण्यात आली होती, परंतु ती सध्या बंद अवस्थेत असल्याने ती सुरू करण्यात यावी.
संजय पिंगळे, शेतकरी, मखमलाबाद, नाशिक.
SCROLL FOR NEXT