पुढारी ऑनलाईन डेस्कः नाशिक मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात झाला असून यामध्ये चार जण गंभरी जखमी झाले आहेत. नाशिकच्या द्वारका उड्डाणपूलावर हा अपघात झाला आहे. यामुळे नाशिकवरून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. उड्डाण पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा आहेत. सांयकाळच्या सुमारास हा अपघात घडल्याचे सुत्रांकडून समजते वाहनांच्या चार ते पाच किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या असून गेल्या 30 मिनिट पासून ही वाहतूक ठप्प होती.